ashadi ekadashi 2021 : कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी साधेपणाने साजरी होत असतानाच एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर मधल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशी साधेपणाने साजरी होत असतानाच एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर मधल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यंदा लाखो वारकऱ्यांना पंढरपुरात येता आले नाही. कोरोना परिस्थितीमुळे मनाई घालण्यात आली आहे. मानाच्या पालख्यांनाच फक्त परवानगी देण्यात आली आहे.
पंढरपूर नगरी सजली जरी असली तरी कोरोनाच्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना मात्र विठ्ठलनगरी गाठता आली नाही.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे सलग दुसऱ्या वर्षी वारकऱ्यांविना पंढरपूर नगरीत आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.