फोटो क्रेडिट - आनंद महिंद्रा ट्विटर हँडल
मुंबई, 15 ऑगस्ट : देशात स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आव्हान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी राबविली जात आहे. याच्याशी संबंधित एक फोटो प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे. या फोटोमध्ये काय दिसते आहे या फोटोला आतापर्यंत 1 लाकांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर 13 हजार पेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये मध्ये एक वृद्ध महिला आणि तिचा पती हर घर तिरंगा मोहीमला समर्थन देत आपल्या घरावर तिरंगा लावताना दिसत आहे, प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच हा फोटो पोस्ट करत त्यांनी त्याला कॅप्शनही दिले आहे. काय म्हणाले आनंद महिंद्रा - हा फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले की, “यावेळी स्वातंत्र्यदिनी सर्वत्र इतका गवगवा का सुरू आहे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर या या दोघांना विचारा. कोणत्याही व्याख्यानापेक्षा हे दोन्ही तुम्हाला चांगले समजावून सांगतील. जय हिंद.” असे आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे. या फोटोची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा - Pune : झंडा उंचा रहे हमारा : दिव्यांग व्यक्तीनं 75 पायऱ्या हातानं चढून फडकवला तिरंगा, VIDEO
हर घर तिरंगा मोहिमेचं राज्यपालांकडून कौतुक - तिरंगा हा काही कुठल्या पक्षाचा झेंडा नाही. हा तर तो आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. नाहीतर यापूर्वी तिरंग्यावर अनेक बंधनं होती. फक्त सरकारी कार्यालयावरच ध्वजच फडकवला जायचा पण पंतप्रधानांनी आज हर घर तिरंगा अभियान राबवून सर्वांना तो अधिकार दिला’ असं म्हणत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींच्या (pm modi) हरघर तिरंगा मोहिमेचे तोंडभरून कौतुक केलं आहे.