सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.
अमरावती, 2 मे: विदर्भात अमरावतीमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 वर पोहोचला असून आतापर्यत कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे, वरुड येथील तहसीलदारांच्या वाहनचालकाच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने धसका घेतला आहे. वरूडचे तहसीलदार, BDO,आरोग्य अधिकारी, 4 डॉक्टरांसह 16 कर्मचाऱ्यांना क्वॉराटाईन करण्यात आलं आहे. हेही वाचा.. चिंता वाढली! राज्यात शनिवारी कोरोनामुळे 36 रुग्णांचा मृत्यू तर रुग्णांचा आकडा 12296 वर तहसील कार्यालयाचे सॅनिटायजेशन करण्यात आले आहे. वरूड तालुक्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून वाहन चालकाच्या आसपासचा परिसर पूर्णतः कांटॉन्मेट झोन घोषित करण्यात आला आहे. वरूड तालुक्याची संपूर्ण यंत्रणा क्वाराटाईन झाल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. सर्वांना घरूनच काम करायला सांगण्यात आले आहे. अमरावती शहरात कोरोनाच संक्रमण वाढत असताना शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 53 वर गेली तर सर्वाधिक 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 जण पूर्णपणे बरे झाले आहे. तर 39 जण जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाच संक्रमण आत्तापर्यंत अमरावती शहरापुरताच मर्यादित होतं. मात्र आता हळूहळू हे संक्रमण जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पसरायला सुरुवात झाली. दरम्यान जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या वरुड येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वरुड परिसर बंद करण्यात आला आहे. या महिलेला खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या त्या रुग्णालयाला देखील सील करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर डॉक्टरसह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंणटाईन करण्यात आलं आहे. हेही वाचा.. तब्बल 144 गुन्हे दाखल असलेली जहाल महिला माओवादी चकमकीत ठार वरूड तालुक्यात कसा पोहोचला कोरोना….. तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावर वाहनचालकाच्या वडिलांचं 15 एप्रिल रोजी चांदूर रेल्वे येथे निधन झालं होतं. त्यावेळी वाहनचालक पत्नीसह चांदूर रेल्वे येथे गेले होते. अंत्यविधीला यवतमाळ येथूनही काही जण आले असल्याची माहिती आहे. त्यातून वाहनचालकाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहन चालकाच्या कुटुंबातील 4-5 जणांना व चांदूर रेल्वे येथील 4 जणांना अमरावती आयसोलेशान वॉर्डात दाखल करण्यात आले असून या सर्वांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहे. चांदूर रेल्वे शहराच्या सर्व सीमा सील करण्यात आल्याचे नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे.