JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Farmer Story : वन्यप्राण्यांपासून शेतीला धोका, शेतकऱ्याकडून शेती संरक्षणाचा यशस्वी प्रयोग

Farmer Story : वन्यप्राण्यांपासून शेतीला धोका, शेतकऱ्याकडून शेती संरक्षणाचा यशस्वी प्रयोग

वन्य प्राण्यांपासुन पिकांचे रक्षण (Crop Protection from Wild Animals) करण्याकरिता शेतीला लोखंडी कुंपण करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. तसेच विद्युत प्रवाह लावून शेतीला कुंपण केल्यास वन्यप्राण्यांचा मृत्यूही (Wild Animals Death) होऊ शकतो. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक यशस्वी प्रयोग केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अकोला, 22 मे :  शेतकरी राजा राबराब राबून आपल्या शेतातील पिकांना वाढवतो. मात्र, अनेकदा वन्यप्राण्यांपासून (Wild Animals) पिकांच्या नुकसानीचा धोका असतो. (Risk of crop damage) अशा परिस्थितीत वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करणे, हे फार महत्त्वाचे असते. (Crop Protection from Wild Animals) याच परिस्थितीमुळे अकोला (Akola) जिल्ह्यातील शेतकऱ्याने आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर एक चांगला प्रयोग केला आहे. जाणून घेऊया, नेमका काय आहे हा प्रयोग. अकोल्यातील शेतकऱ्याचा विनाखर्चाचा यशस्वी प्रयोग -  अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात असणाऱ्या शेती पिकांचे वन्यप्राणी मोठ्या नुकसान करतात. (Crop damage by Wild Animals) मात्र, या वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरता (Crop Protection from Wild Animals) शेतीला लोखंडी कुंपण करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. तसेच विद्युत प्रवाह लावून शेतीला कुंपण केल्यास वन्यप्राण्यांचा मृत्यूही (Wild Animals Death) होऊ शकतो. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने एक यशस्वी प्रयोग केला आहे. अकोला जिल्ह्यातील खापरवाडी येथील शेतकरी जगन बगाडे यांनी विनाखर्चाचा निवडुंग वनस्पतींचे जैविक कुंपण (Organic fencing of cactus plants) करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. शेती पिकांचे संरक्षण इतकेच नव्हे तर… शेतकरी जगन बगाडे यांनी कॅक्ट्स म्हणजेच निवडूंग प्रकारातील वनस्पतीचे जवळपास 22 एकर शेतीला चारही बाजूंनी कुंपण केले. शेतातील कुंपण 12 फुट उंच व 3 फुट रुंद आहे. या कुंपणामुळे पिकांमध्ये वन्यप्राणी येत नाहीत. तसेच पिकांचे संरक्षण होते. इतकेच नव्हे तर शिवाय लोखंडी कुंपणासाठी लागणाऱ्या खर्चातही बचत होते. हे कुंपण पूर्णत: वनस्पतीवर आधारित असून आता अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये हा प्रयोग राबवण्यासाठी पुढे येत आहेत. फुलवली बारामाही बागायती शेती -  खार पाणपट्ट्यातील शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असते. मात्र, अकोट तालुक्यातील खापरवाडी बु. येथील जगन प्रल्हादराव बगाडे या शेतकऱ्याने खारपाणपट्ट्यात संरक्षित सिंचनाची सोय केली. या माध्यमातून त्यांनी बारामाही बागायती शेती फुलविली आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेती सभोवताली विनाखर्चाची वनस्पतीची तटबंदी केली. विविध प्रयोगांच्या माध्यमातून ते यशस्वी बागायती पिके घेत असून, त्यांच्या शेती प्रयोगाची दखल शासनाने घेतली आहे. हेही वाचा -  Inspiring Story : 84 व्या वर्षीही आजी करतात शेती, 5 एकराची केली 30 एकर! तरुणांना लाजवेल असा उत्साह

खारपाणपट्टात पीक पद्धतीत बदल करून हरितक्रांती घडविणाऱ्या या कोरडवाहू शेतकऱ्याने पाणलोट, जलसंवर्धनाचे कार्य केले. पडित जमिनीवर पालेभाज्यांच्या माध्यमातूनही त्यांनी उत्पन्न घेतले. तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने तीन वर्षांमध्ये तब्बल 32 शेततळे व 25 बोअरवेल केल्या. यामुळे येथील पाण्याची पातळी वाढली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या