Home /News /news /

Inspiring Story : 84 व्या वर्षीही आजी करतात शेती, 5 एकराची केली 30 एकर! तरुणांना लाजवेल असा उत्साह

Inspiring Story : 84 व्या वर्षीही आजी करतात शेती, 5 एकराची केली 30 एकर! तरुणांना लाजवेल असा उत्साह

मनकर्णाबाई असे या आजीबाई यांचे नाव आहे. त्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथे राहतात. त्यांचे 84 वर्ष आहे. या आजी अजूनही शेतात राबतात. (84 year Old woman doing farming) फक्त राबतातच नाहीत तर शेतीचे नियोजन करुन लाखो रुपयांचं उत्पन्नही घेतात.

पुढे वाचा ...
    अकोला, 21 मे : लहान मुलांना विचारा आजी (Grandmother) म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येते? छान छान गोष्ट सांगणारी आजी, मायेच्या हातानं घास भरवणारीही आजीच आठवते. मात्र, हेच हात 84 वर्षाच्या वयातही शेतीची कास धरतात तेव्हा काय कमाल करू शकतात, (Old woman doing farming) याची कल्पनाही आपण करू शकत नाही. तेही न दमता न थकता आजी शेतीत काम करतात, मेहनत घेतात. तुम्ही विचारात पडला असाल की, हे कसं होऊ शकतं? हो. चक्क 84 वर्षाच्या वयात एक आजी कशी काय शेती करू शकते, नेमकी त्यांना काय प्रेरणा मिळाली, याबद्दलच जाणून घेऊयात. मनकर्णाबाई असे या आजीबाई यांचे नाव आहे. त्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथे राहतात. त्यांचे 84 वर्ष आहे. या आजी अजूनही शेतात राबतात. (84 year Old woman doing farming) फक्त राबतातच नाहीत तर शेतीचे नियोजन करुन लाखो रुपयांचं उत्पन्नही घेतात. त्यांना शासनाकडून प्रोत्साहन पारितोषिक देऊनही गौरविण्यात (Prize from government) आले आहे. 5 एकराची शेती नेली 30 एकरावर मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या त्या घरात मुला व नातवंडांना घेऊन या मनकर्णा आजी राहतात. मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे 1972 मध्ये एका आजारामुळे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वाट्यावर पाच एकर शेती आली. त्यावेळी त्यांची मुले लहान होती. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी लहान मुलांचा सांभाळ करत त्यांना सोबत घेऊन काबाड केले. या कष्टांचच फळ म्हणजे आता 5 एकराची शेती त्यांनी 30 एकरावर आणून ठेवली आहे. आज मनकर्णा आजी यांच्याकडे 30 एकर शेती आहे. या आजी आजही स्वतः आपल्या शेतीत राबतात. त्यांनी शेतामध्ये सुरुवातीला केळी, पपई, असे फळपिके घेतले. मात्र, आता सद्यस्थितीत खरीप हंगामाला कापूस, सोयाबीन, तूर, तर रब्बी हंगामाला हरभरा , गहू , उन्हाळी भुईमूग आणि भाजीपाला अशा पद्धतीने आजी पिक घेत आहेत. 2002 मध्ये शासनाकडून गौरव आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही, अशा जमिनीत आजीने केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यासाठी 2002 मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आजीला नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले होते. आजही या 84 वर्षांच्या तरुण आजीची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवणभक्ती तीक्ष्ण आहे. अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजाराने त्या ग्रस्त नाहीत. मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागही लागत नाही तरुण पिढीला लाजवेल, असे काम त्या शेतात मजुरांबरोबर काम करतात. मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही, असं या आजीबाई सांगतात. कारण शेती असु दे किंवा दुसरं कोणतही काम असो, मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही. मेहनतीने जर कमाविले तर त्याला डागसुद्धा लागत नाही, असं त्या स्वाभिमानाने आजही सांगतात. आजीचे जीवन म्हणजे पूर्ण संघर्षमय राहिले आहे. त्यात आयुष्यात भरपूर संकटे आली. मात्र, त्या डगमगल्या नाहीत आणि आजीने त्यावर मात केली. इतकेच नव्हे तर शेती करणारी आजी तरुण शेतकऱ्यांसाठी एक आदर्श बनली आहे.
    First published:

    Tags: Akola News, Farmer, Old woman

    पुढील बातम्या