JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar : शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अक्षयला कशी मिळाली सैन्यात नोकरी? Video

Ahmednagar : शेतमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या अक्षयला कशी मिळाली सैन्यात नोकरी? Video

अक्षय उकरडेच्या लहानपणीच पितृछत्र हरवलं आणि नंतर आई देखील आजारपणामुळे कायमची निघून गेली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 06 डिसेंबर : समाजात अनाथ म्हणून वावरताना अनेक अडचणी येतात. अनाथांना कोणीही वाली नसल्याने अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांच्या सहकार्यामुळे यश संपादन करतात, मात्र, नगर च्या हावरगाव येथील अक्षय उकरडेच्या लहानपणीच पितृछत्र हरवलं आणि नंतर आई देखील आजारपणामुळे कायमची निघून गेली. त्यामुळे अक्षयच्या नशिबात अनाथपण आलं. मात्र, यातून खचून न जाता मेहनतीनं सैन्य भरतीची तयारी करून अक्षयनं यश संपादन केलं आहे. अक्षयचा प्रवास नक्कीच इतर तरुणांना प्रेरणादायी ठरणारा आहे.   घरची गरिबी असलेल्या अक्षयला नंतर आजोळी म्हणजे मामाच्या गावी सहारा मिळाला, बारावी पर्यंतचे शिक्षण जीवन विकास मुलांची निवासी आश्रमशाळा येथे पूर्ण केले. सुट्टीला कधी मामा कडे येणं जाणे असाचे, त्यानंतर दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या. कठीण परिस्थितीवर मात करत भारतीय सेनेच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. अनाथ असून देखील आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आणि स्वतः काहीतरी करण्याची जिद्द, अक्षयला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने सैन्यात भरती होण्यासाठी तयारी सुरू केली. Satara : संक्रांतीला घरोघरी लागणारं सुगड कसं बनवतात? पाहा Video शिक्षणासाठी पैसे नव्हते परिस्थिती हलाखीची असल्यानं चांगल्या अकॅडेमीत शिक्षणासाठी पैसे नव्हते. सुरुवातीला गावाकडे मैदानाची तयारी सुरू केली. मात्र, लेखी परीक्षेसाठी आता कुठेतरी अकॅडमीचा सहारा घ्यावा लागणार होता. तेव्हा नगर मधील नगर औरंगाबाद रोड वरील प्रहार अकॅडमीने त्याला मोफत प्रशिक्षण दिले.   Nashik: जुळ्या मुलांच्या आईची बाईकवर देशभ्रमंती, 21 हजार किमी केला प्रवास! Video संघर्षाचे जीवन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अक्षयने मिळवलेलं यश प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अक्षय जीवनात अनेकवेळा संघर्ष करावा लागला. आपण अनाथ आहोत हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी त्याला खूप वर्ष वाट पाहावी लागली. अनाथाला केंद्रात आरक्षण मिळावं अशी मागणी अक्षय करतो. अक्षयने मिळवलेल्या जिद्दीला सर्वजण सलाम करतात.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या