JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story : दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी!

Success Story : दहावीतच दृष्टी गेली पण हार मानली नाही, जिद्दीनं मिळवली सरकारी नोकरी!

नितीन बोरुडे यांनी दृष्टी नसतानाही मुंबईपर्यंत आत्मविश्वासान पावलं टाकली. अभ्यास करून एनटीपीसी परीक्षा पास केली आणि वेस्टर्न रेल्वे विभागात नोकरी मिळवली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 31 ऑक्टोबर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने या गावातील नितीन बोरुडे यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. डोळे बंद करून आपण चार पावले देखील नीट चालू शकत नाहीत. मात्र, नितीन बोरुडे यांनी दृष्टी नसतानाही मुंबईपर्यंत आत्मविश्वासान पावलं टाकली. खेडेगावात आपले शिक्षण पूर्ण केलं. अभ्यास करून एनटीपीसी परीक्षा पास केली आणि वेस्टर्न रेल्वे विभागात नोकरी मिळवली. आता ते सात लाख पॅकेज घेतात. जिद्दीच्या आणि बुद्धीच्या जोरावर नितीन यांनी जीवनात उत्तुंग भरारी घेतली. त्यांचा हा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. अहमदनगर  जिल्ह्यातील खारे कर्जुने या गावात 29 ऑगस्ट 1986 ला नितीन बोरुडे यांचा जन्म झाला. जन्मताच उजव्या डोळा दृष्टहीन होता. मात्र, डाव्या डोळ्यानं हे सगळे जग पाहता येत होत. त्यामुळे बालपण अगदी सर्वसामान्य मुलांप्रमाणेच होत. बालपणी क्रिकेट खेळणं खूप आवडत असे, त्यांनी सर्व रंग, माणसं, ठिकाणं डोळ्यांनी पाहिलेली आहेत. सुरुवातीच्या काळात डाव्या डोळ्याचीही दृष्टी थोडी थोडी कमी व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे फळ्यावर लिहीलेलं कमी दिसत होत. इतराच्या वहीत पाहून त्यांना लिहायला लागत. एकेदिवशी डाव्या डोळ्यानेही साथ सोडली. नितीन यांच्या जीवनात कायमचा अंधार दाटून आल. तेव्हाच दहावीची बोर्डाची परीक्षा  होती तरी देखील न खचता आलेल्या परिस्थितीवर मात करत नितीनं यांनी ७८ टक्के मिळाले आणि पुणे अपंग बोर्डात दुसरा क्रमांक पटकावला. ब्रेल लिपी अवगत केली महाविद्यालीन शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रेल लिपी शिकणं महत्वाच होत. त्यामुळे FY ला असताना ब्रेल लिपी अवगत केली. तोपर्यंत ते सर्वसामान्य प्रमाणे शिक्षण घेत होते. टेप कॅसेट रेकॉर्डिंगचा आधार घेत अभ्यास केला. राज्यशास्त्रमधून एमए उत्तीर्ण झाले. या सगळ्या प्रवासात नातेवाईकांपेक्षा मित्रांचे सहकार्य जास्त मिळाल्याच नितीन सांगतात.   ‘या’ गावानं महिला सक्षमीकरणात कमावलं नाव!, महिलांसाठी राबविले अनोखे उपक्रम, पाहा Video मुंबईमध्ये नोकरी करणं सोप नव्हतं आपल्याला चांगली नोकरी लागावी हे ध्येय नितीन यांनी उराशी बाळगलं होतं. त्यासाठी स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु केला. एनटीपीसी ही परीक्षा देऊन उतीर्ण झाले. वेस्टर्न रेल्वे विभागात क्लार्क म्हणून नोकरी लागली. पुढे यात परीक्षा देत ते कार्यालय अधीक्षक झाले. आता ते सात लाख पकेज घेतात. मुंबईमध्ये नोकरी करणं सोप नाही. मुंबईत सर्व सामान्य माणसाला देखील सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षाचा असतो. लोकलचा प्रवास असेल तिथला राहणीमान असेल, तिथल्या रोजच्या दैनंदिन गोष्टी असतील, यांच्यासोबत जुळवून घेताना त्रास झाला. सुरुवातीच्या काळात नितीन सोबत सोबत गावातील मित्र आठ-आठ दिवस राहत होते. मुलांना मार्गदर्शन नितीन यांनी स्वतः च्या बळावर हक्काचं घर बांधल. मोकळ्या वेळेत ते आता ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. या मुलांसाठी देखील ते प्रेरणादायी आहेत. अपंग अंधांना फक्त समाजाची सहानुभूती नको असते. तर समाजाकडून सहकार्याची देखील अपेक्षा असते, नितीन यांना आज जीवनसाथी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या