JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : मूर्ती लहान किर्ती महान! बारावीतील मुलीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

Video : मूर्ती लहान किर्ती महान! बारावीतील मुलीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

नगरच्या बारावीत शिकणाऱ्या नेहल जोशीने न्यूमो फ्री मास्क सिस्टीम तयार केली आहे, न्यूमोनिया आजारापासून पूर्ण सुरक्षा देणारी ही ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीम आहे.‌

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 27 ऑक्टोबर : न्यूमोनिया हा एक गंभीर श्वसन रोग आहे, जो जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो. कोविडमधून बरे झाल्यानंतर लोकांना न्यूमोनियाचा त्रास होत असल्याचेही अनेक संशोधनातून समोर आलं आहे. कोविड होऊन न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. यातच नगरच्या बारावीत शिकणाऱ्या नेहल जोशीने न्यूमो फ्री मास्क सिस्टीम तयार केली आहे, या आजारापासून पूर्ण सुरक्षा देणारी ही एक अशी मास्क सिस्टीम आहे जी शुद्ध ऑक्सिजन सपोर्ट देते.‌ न्युमोनियावर उपचार करताना योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. अशा वेळी नेहल ने बनवलेले न्यूमो फ्री मास्क सिस्टीम उपयुक्त ठरू शकते. गेल्या काही वर्षापासून आरोग्याच महत्त्व वाढले आहे. प्रत्येकजण कोणताही आजार होऊ नये यासाठी वेळीच काळजी घेतात. सार्वजनिक ठिकाणी फिरताना विशेष काळजी घेण महत्त्वाचे आहे. न्यूमोनिया रुग्णाच्या खोकला व शिंकेद्वारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. न्यूमोनिया हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा श्वसन संक्रमण आहे. ज्यामुळे एक किंवा दोन्ही फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्या सुजतात. हवेच्या पिशव्या द्रवाने भरतात. ज्यामुळे कफ किंवा पू सह खोकला, ताप, थंडी वाजून येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड फुफ्फुसे इनहेलर सिस्टीमद्वारे निरोगी ठेवते व न्यूमोनियाच्या जीवाणूंपासून बचाव करते. ही सिस्टीम पर्यावरणपूरक तसेच सौर ऊर्जेवर आधारित आहे. नेहलच्या या संशोधन अनेक डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळाले आहे. याला विविध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या बरोबरच नेहलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंद झालेली आहे.‌ देशातील नामांकित जागरण जोश बेस्ट युझ ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी ह्या अवॉर्डने नेहलचा दिल्ली येथे सन्मान झालेला आहे.‌ Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, ‘नेप्ती’च्या भेळचा आहे भारीच थाट! महाराष्ट्राचा आदर्श युवा विज्ञान रत्न पुरस्कार सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत नेहलने जागतिक स्तरावर 44 वा क्रमांक पटकावला. सिल्व्हरझोन इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाडमध्ये नेहलने केमिस्ट्री व‌ बायोलाॅजी या विषयात परफेक्ट स्कोअर करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. याचसोबत नेहलला महाराष्ट्राचा आदर्श युवा विज्ञान रत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. दयानंद सागर बेंगळुरू युनिव्हर्सिटीचा राष्ट्रीय स्तरावर इनोव्हेशन अवाॅर्ड प्राप्त झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या