JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar : बॉम्बचा मारा, घातक मिसाईल, शत्रूवर तुटून पडणारे जवान, काळजाचा ठोका चुकवणारा युद्ध सराव Video

Ahmednagar : बॉम्बचा मारा, घातक मिसाईल, शत्रूवर तुटून पडणारे जवान, काळजाचा ठोका चुकवणारा युद्ध सराव Video

शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेणारे मिसाईल, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडणारे पायदळाचे जवान, असा प्रत्यक्ष युद्धाचा थरार पाहायला मिळाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 30 जानेवारी : अहमदनगर मधील के के रेंजमध्ये सैन्याच्या युद्ध प्रात्यक्षिकाचा थरार पाहण्यास मिळाला.  काळजाचा ठोका चुकवणाऱ्या चित्तथरारक युद्ध सरावात बॉम्बचा मारा करण्यात आला. धुळीच्या लोटातून वाट काढणारे रणगाडे, शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेणारे मिसाईल, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडणारे पायदळाचे जवान, असा प्रत्यक्ष युद्धाचा थरार पाहायला मिळाला.   अहमदनगरपासून 15 किमी वरील के के रेंजच्या माळरानावर सैन्याच्या युद्ध प्रात्यक्षिकाचा थरार पाहण्यास मिळाला. के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर नेपाळ व निमंत्रित मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर भारतीय लष्कराने एक तास युद्ध सरावाची प्रात्यक्षिके दाखविली. भारतीय सैन्याच्या प्रमुख प्रशिक्षण संस्था असलेल्या आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री सेंटर यांच्यावतीने मेजर जनरल अनिलराज सिंग काहलो यांच्या मार्गदर्शनाखाली हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले. ‘टी-90’ आणि ‘टी- 72’ रणगाडे युद्ध सरावात ड्रोनच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवून शत्रूला एका सेकंदात निष्प्रभ करण्याच्या लष्कराच्या क्षमतेचे प्रदर्शन दाखविण्यात आले. बॉम्बचा बेछूट मारा करीत धुळीच्या लोटातून वाट काढणारे रणगाडे, शत्रूच्या बंकरचा अचूक वेध घेणारे मिसाईल, हेलिकॉप्टरमधून उतरून शत्रूवर तुटून पडणारे पायदळाचे जवान, ‘टी-90’ आणि ‘टी- 72’ अशा विविध रणगाड्यांतून सुरू असणारा बॉम्बचा मारा, असा युद्धाचा थरार अनुभवायला मिळाला. Ahmednagar : ‘या’ गावात आहे चक्क दुर्योधनाचं मंदिर! पाहा Video अचूक मारा करणारा हेलिकॉप्टर युद्धाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांनी प्रात्यक्षिक झाल्यानंतर त्याचे सादरीकरण करणाऱ्या जवानांचे कौतुक केले. यावेळी नेपाळचे लष्करी उपस्थित, डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.   रणगाड्यांमधून डागण्यात येणारे तोफगोळे, पायदळाचे चित्तथरारक युद्ध कौशल्य, आकाशात घिरट्या घालून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक मारा करणारा हेलिकॉप्टर, धुळीच्या लोटातून वाट काढतानाच लक्ष्याचा अचूक वेध घेत त्यांच्यावर तोफगोळे डागणारे रणगाडे, प्रात्यक्षिके यानिमित्त दाखवण्यात आली. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या