JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिर्डीच्या साईबाबांसाठी सोन्याची बासरी; दिल्लीतील कुटुंबाने या भेटीमागील सांगितलं अनोखं कारण

शिर्डीच्या साईबाबांसाठी सोन्याची बासरी; दिल्लीतील कुटुंबाने या भेटीमागील सांगितलं अनोखं कारण

शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रुपात दर्शन दिले आहे, असे सांगितले जाते. कधी श्रीराम स्वरुप तर कधी भगवान श्रीकृष्ण स्वरुपात साईंबाबा भाविकांना दिसल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुनिल दवंगे शिर्डी, 9 ऑगस्ट : साईबाबांच्या चरणी नेहमीचं सोने-चांदी आणि हिरे मोती यांच दान येत असते. बाबांच्या सिंहासनासह मंदिरातील गाभारा व अन्य सर्व वस्तू सोन्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे भाविक आता साईंच्या चरणी वेगळ्या पद्धतीनं सोन दान करत आहेत. दिल्ली येथील निस्सिम साईभक्त ऋषभ लोहिया यांनी साईचरणांवर आकर्षक कारागिरी केलेली सोन्याची बासरी अर्पण केली आहे. साईंच्या धूपारती नंतर बाबांना ही बासरी भेट देण्यात आली आहे. या बासरीचे वजन वजन 100 ग्रॅम आहे. तर किंमत 4 लाख 85 हजार रुपये सांगितली जात आहे. अनेक दिवसांची इच्छा पूर्ण -  शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रुपात दर्शन दिले आहे, असे सांगितले जाते. कधी श्रीराम स्वरुप तर कधी भगवान श्रीकृष्ण स्वरुपात साईंबाबा भाविकांना दिसल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. सर्वधर्म आणि सबका मालिक एक असा संदेश देत “जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव” असा प्रत्यय भाविकांना शिर्डीत येतो. त्यामुळे भाविक आपल्या मनातील भक्तीप्रमाणे बाबांना मानून दर्शन घेतात. दिल्ली येथील साईभक्त ऋषभ लोहिया यांची अनेक दिवसांची साईबाबांना सोन्याची बासरी भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी अतिशय सुबक आणि आकर्षक कारागीराकडून सुवर्ण बासरी बनून घेतली. दहा तोळ्याच्या ह्या बासरीवर सारेगमपा या पाच सुरांचे छिद्र असून मनमोहक सजावट करण्यात आली आहे. बाबांच्या धूपारती नंतर साईंना ही बासरी भेट देण्यात आली आहे. दिल्लीतील साईभक्ताने शिर्डी येथे साईमंदिरात साई बाबांना अर्पण केलेली बासरी

दिल्लीतील साईभक्ताने शिर्डी येथे साईमंदिरात साई बाबांना अर्पण केलेली बासरी

साईबाबांच्या मंदिरात अनेक सण उत्सव साजरे होतात त्याचप्रमाणे श्रीरामजन्म आणि श्रीकृष्ण जन्मालाही पाळणा हालवला जातो. परंपरेन सुहासिनी पाळणा गातात व समाधी मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साईसंस्थान कडून  साजरा होतो. यावेळी लाकडी बासरी ठेवण्यात येत होती. मात्र, आता साईंना सोन्याची बासरी दानात आल्यानं यापुढे सुवर्ण आणि आकर्षक बासरी वापरली जावू शकते. हेही वाचा -  पत्नीची शेवटची इच्छा केली पूर्ण; 80 वर्षीय डॉक्टरने साईबाबांना चढवला 40 लाखांचा सोन्याचा मुकूट शिर्डीच्या साई बाबांनी संपुर्ण हयात फकिर आणि भिक्षा अवस्थेत व्यतीत केली. मात्र, बाबांच्या भक्तांनी श्री साई संस्थांनात आज पर्यंत कोट्यावधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. साईमंदिराचा कळस, बाबांचे सिंहासन, साईंची समाधी, मुर्तीचा मुकूट, माळा, मंदिराचा गाभारा, दर्शन भाग व खांब, पुजेचे ताट, शंख, आरती, पाण्याचा लोटा, घंटी , नैवद्याचं ताट,अशा सर्व सोन्याच्या वस्तू दान स्वरुपात देण्यात आल्या आहेत. त्यातच आता  आगळ वेगळं दानही बाबांना चढवण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या