JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : हलाखीच्या परिस्थितीतून भावनाची भरारी, संसार सांभाळत उभारला व्यवसाय

Video : हलाखीच्या परिस्थितीतून भावनाची भरारी, संसार सांभाळत उभारला व्यवसाय

जिथे चिकाटी, मेहनत आणि जिद्द तिथं स्वप्न पूर्ण झाल्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. भावना केदार यांनी देखील बिकट स्थितीत मुलं बाळांसह संसार सांभाळला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 9 नोव्हेंबर : स्त्रीला घर संसार सांभाळून आपली स्वप्न पूर्ण करणं मोठं आव्हान असतं. मात्र जिथे चिकाटी, मेहनत आणि जिद्द तिथं स्वप्न पूर्ण झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. नगरमधील भावना केदार यांनी देखील बिकट स्थितीत मुलं बाळांसह संसार सांभाळला आहे. भावना यांनी कर्तव्य सांभाळत आपली स्वप्नही पूर्ण केलं आहे. समाजाचा विचार न करता भावना यांनी स्वत:चा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवला. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीसही मिळवले.   पतीच्या निधनानंतर भावना यांनी सर्व काही उभे केले आहे. दरम्यान भावना यांना आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.  मात्र न डगमगता त्या संघर्षात खंबीरपणे उभा राहिल्या. तीन मुलांचा सांभाळ करत त्यांची सर्व जबाबदारी पार पाडत आपली स्वप्न पूर्ण केली. कोरोना काळात पतीचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. कुटुंबाची सर्व जबाबदारी भावना यांच्यावर आली. दोन मुली, एक मुलगा यांचे शिक्षण, त्यांचे लग्न या सगळ्यासाठी खूप कष्ट करावे लागले. घरची परिस्थिती हलाखीची 1992 ला भावना यांचे लग्न दत्तात्रय केदार यांच्या सोबत झालं. अनेक स्वप्न घेऊन आपल्या पतीच्या घरी आल्या. शिक्षण 10 वीपर्यंत झालेलं. पण पतीच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. दत्तात्रय यांचा पगार तुटपुंजा होता. या पगारात आणि घरची आर्थिक परिस्थिती पाहता आपले स्वप्न पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे भावना यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि व्यवसाय सुरू केला. खेळण्या-बागडण्याच्या वयात कष्टाचे चटके; वडिलांचे छत्र हरवल्याने सुरू केला व्यवसाय सौंदर्य पॅकची विक्री  सौंदर्याचे अनेक पॅक घरीच तयार करून त्याची विक्री केली. यातून त्यांच्या व्यवसाय वाढत गेला आणि पार्लर नावरूपाला आले. डायरेक्ट सेलिंग, मार्केटिंग केली. दरम्यान समाजात अनेकांनी नाव ठेवली. महिला म्हणून कामासाठी बाहेर फिरणे अनेकांना चुकीचे वाटले. मात्र, समाजाचा विचार न करता भावना यांनी स्वत:चा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवला. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षीसही मिळवले.   अत्याधुनिक पार्लर अनेक छोटे मोठे जोड व्यवसाय करून पैसे उभे केले. यातून प्रशस्त, अत्याधुनिक असं स्वतः च मोठं पार्लर सुरू केलं. प्रिझम अकॅडमी पार्लरची परिसरात चांगली ओळख आहे. भावना पार्लर व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. स्कीनच्या सर्व ट्रिटमेंट, हेयर, मुलींचे ट्रेनिंग हे सगळं त्या आज स्वतः च करतात.आपल्याकडील येणारे कस्टमर आपल्यासाठी येतात त्यांची सेवा मी माझ्या हाताने करते, असे भावना सांगतात.   पत्ता प्रिझम अकॅडमी, प्रोफेसर चौक ,मॉन्जीनिअस शॉप जवळ, अहमदनगर संपर्क- 8459236007.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या