JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तेरे संग प्यार मैं नहीं तोड़ना...' नागिणीच्या मृत्यूनंतर कोब्रा बसून होता तिच्या मृतदेहाजवळ!

'तेरे संग प्यार मैं नहीं तोड़ना...' नागिणीच्या मृत्यूनंतर कोब्रा बसून होता तिच्या मृतदेहाजवळ!

आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहाजवळ फणा उभारून बसला होता.

जाहिरात

आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहाजवळ फणा उभारून बसला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदगाव, 11 मे :  नाग आणि नागिणीवर (cobra snake couple ) आजपर्यंत आपण अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्या असतील. नाग आणि नागिणीमध्ये असलेले अतूट प्रेमाची अशीच एक अजब घटना नाशिक (nashik) जिल्ह्यातील नांदगावमध्ये (nanadgaon) समोर आली आहे. एक नागिणीचा मृत्यू झाला आहे, पण तिच्या मृतदेहाजवळ नाग फणा काढून तसाच उभा होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एका टाईल्स बनवणाऱ्या कारखान्यात ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोब्रा जातीचे नाग आणि नागिणी जोडी (cobra snake) ही टाईल्स बनविणाऱ्या कारखान्याच्या अवतीभवती फिरायची. अनेक वेळा कर्मचाऱ्यांना याच दर्शनही झाले.

पण आज दुपारी अचानक नागिणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. नागिणीचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. या नागिणीचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही. वाहनाखाली सापडल्यामुळे या नागिणीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण जेव्हा नागाने नागिणीचा मृतदेह पाहिला तेव्हा तो तिथेच फणा काढून स्तब्ध उभा होता.  आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली यावर नागाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे तो तिच्या मृतदेहाजवळ फणा उभारून बसला होता. ( महापालिका निवडणुका तात्काळ लागल्यास अडचणींचा डोंगर, मंत्रिमंडळ बैठकीत खलबतं ) कारखान्यातील कामगारांनी हे दृश्ये पाहिल्यानंतर त्यांनी सर्प मित्राला बोलावले. त्याने अथक प्रयत्न करून नागाला पकडल्यानंतर त्याला निसर्गाच्या सहवासात सोडले तर मयत झालेल्या नागिणीला वन विभागाच्या हवाली केले आहे. नाग आणि नागिणीचे विभक्त होण्याचे दृश्य पाहून उपस्थितीत कामगार ही थक्क झाले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या