JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rajya Sabha Election 2022: ''कोणाचा पराभव झाला?'', राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले....

Rajya Sabha Election 2022: ''कोणाचा पराभव झाला?'', राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत म्हणाले....

Rajya Sabha Election 2022: शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जून: 9 तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल (Maharashtra Rajya Sabha Election 2022) जाहीर झाला. या निकालात महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. संजय राऊत यांची प्रतिक्रिया कोणाचा पराभव झाला ? पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं संजय पवार यांना पडली आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मोठा विजय झाला, हे चित्र उभे केले जातंय.काही अपेक्षित मत आम्हाला पडली नाही, ते आम्हाला माहित आहे. त्यांना विजय मिळाला, अभिनंदन, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले त्यांच्याकडे गेले नाहीत. काही अपक्ष त्यांच्याकडे केले. त्यांची व्यूहरचना उत्तम केली होती. आमिषे,केंद्रिय यंत्रणांचा वापर केला गेला. एक जागा त्यांनी जिंकली. माझं एक मत त्यांनी बाद करायला लावलं. निवडणूक आयोगाने त्यांना प्राधान्य दिले.आम्हीही दोघांविरोधात तक्रार केली होती.पण दखल नाही घेतली, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणाला किती मतं मिळाली? पियूष गोयल - 48 अनिल बोंडे - 48 संजय राऊत 41 प्रफुल्ल पटेल - 43 इम्रान प्रतापगढी 44 संजय पवार - 33 धनंजय महाडिक - 41 असा झाला गेम भाजपकडे एकूण 106 आमदार आणि 7 अपक्ष समर्थक मिळून 113 आकडा होता. त्यामुळे 123 मते भाजपला पहिल्या प्राधान्याची मिळाली. यात 48 मते अनिल बोंडे आणि 48 मते गोयल यांना मिळाली. त्यामुळे एकूण 96 मतं झाली. त्यानंतर धनंजय महाडिक यांना 17 मते पहिल्या पसंतीची मिळाली. 27 पैकी 17 मते भाजपची होती. उरली 10 मते बाकी होती. यात 3 मतं बविआने महाडिक यांना दिली. 1 मत मनसेने दिलं. त्यानंतर 9 मतं अपक्षांची असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या