JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ

लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ

Suicide in Satara: साताऱ्यात एका तरुणानं नगरपालिकेच्या समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला (attempt to suicide by climbing on water tank) आहे.

जाहिरात

लग्नाच्या चौथ्याच दिवशी साताऱ्यात तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. (फोटो-टीव्ही9)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 30 ऑगस्ट: साताऱ्यात (Satara) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं सातारा नगरपालिकेच्या समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला (attempt to suicide by climbing on water tank) आहे. पण या घटनेची माहिती वेळीच पोलिसांना मिळाल्यामुळे तरुणाचा जीव वाचवणं शक्य झालं आहे. तरुणानं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन करत आत्महत्येचा प्रयत्न करत होता. त्यामुळे परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. बराच काळ समजावून सांगितल्यानंतर तरुणाला खाली उतरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वी संबंधित तरुणाचा विवाह झाला आहे. लग्नाच्या चौथ्याच दिवशी तरुणानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं (Suicide attempts after 4 days of Marriage) गावात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. पण कौटुंबीक वादातून मानसिक ताण निर्माण झाल्यानं तो पाण्याच्या टाकीवर चढला आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेही वाचा- ‘प्रेयसीला अंत्यसंस्कारासाठी बोलावलं तर माझा आत्मा भटकत राहील’; सुसाइड नोट लिहून तरुणाची आत्महत्या या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाची समजूत घालून त्याला टाकीवरून खाली उतरवलं आहे. यानंतर त्याचं समुपदेशन करत त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. भल्या मोठ्या टाकीवरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची सुखरूप सुटका झाल्यानं अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान या घटनेची माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. हेही वाचा- प्रेम एकीशी आणि संसाराचा बेत दुसरीशी, BF च्या घरासमोरच प्रेयसीनं घेतल पेटवून त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवस सर्वत्र याच घटनेची चर्चा होती. संबंधित तरुण हा सातारा शहरातील गुरुवार पेठ परिसरात वास्तव्याला आहे. पण लग्नाच्या अवघ्या चारच दिवसात तरुणानं असं टोकाचं पाऊल उचलल्यानं कुटुंबीयांसह परिसरात खळबळ उडाली आहे. तुर्तास पोलिसांनी समुपदेशन करत तरुणाला मानसिक आधार दिला आहे. तसेच आत्महत्या न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या