JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया, TET घोटाळ्याबद्दल म्हणाले....

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया, TET घोटाळ्याबद्दल म्हणाले....

राजकारणामध्ये असे बदनाम करण्याचे काम करू नये, ज्यांनी कुणी केले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही

जाहिरात

राजकारणामध्ये असे बदनाम करण्याचे काम करू नये, ज्यांनी कुणी केले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 ऑगस्ट : टीईटी घोटाळ्यामुळे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार अडचणीत सापडले आहे. पण आज अचानक आरोप असताना सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर सर्व आरोपांवर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारच्या अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार  (Maharashtra Cabinet Expansion)  पार पडला आहे. १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात आरोपांमुळे बदनाम झालेले संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना शपथ दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काम करण्याची संधी दिली. ग्रामीण भागात काम करण्यासाठी मला संधी दिली आहे, शेतकरी गोरगरिबांपर्यंत कसे पोहोचणार यासाठी मी काम करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मला जी जबाबदारी देतील ती मान्य आहे, असं सत्तार म्हणाले. ’ टीईटी घोटाळ्या प्रकरणात काही तथ्य नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी माझ्याविरोधात जाणूनबुजून प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. माझी मुलं ही अपात्र होती. अजून रात्रीपर्यंत अनेक नाव आली असतील. मी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. ज्यांनी कुणी हे केलं आहे, त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे, असंही सत्तार यांनी सांगितलं. ‘आता याच्या पाठीमागे कोण आहे, त्यांची शुद्ध भावना होती, याबद्दल मी आज बोलणार नाही. ज्यांनी कृत्य केलं. ज्यांनी हे सगळं घडवलं. का केलं, हे लवकरच समोर येईल. माझ्या मुली सहा वर्षांपूर्वी लागली आहे. पण त्यावेळी टीईटी काहीही नव्हती. कोर्टाने ज्या लोकांचे पगार सुरू आहे, त्यांचे पगार चालू ठेवण्याचे सांगितले होते. माझ्या मुलींची लग्न झाली आहे, त्यांना मुलं आहे. राजकारणामध्ये असे बदनाम करण्याचे काम करू नये, ज्यांनी कुणी केले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही सत्तार यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या