JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लक्ष्य शासन नाही तर...'शिंदे सरकार'चं खातेवाटप जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा घणाघात

लक्ष्य शासन नाही तर...'शिंदे सरकार'चं खातेवाटप जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा घणाघात

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निशाणा साधला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळामध्ये भाजपला महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडचे पाच मंत्री नाराज असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निशाणा साधला आहे. जेव्हा तुमचं लक्ष्य शासनापेक्षा सरकारवर असतं, तेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराला 41 दिवस लागतात, यानंतर खातेवाटपात 5 दिवस जातात. खातेवाटपात सत्तेचं असंतुलन, महिला आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला प्रतिनिधीत्व नाही, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणाला कोणती खाती? राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे. फडणवीस पॉवरफूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जास्त महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या