JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, ठाकरे गटावर आरोप

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, ठाकरे गटावर आरोप

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला.

जाहिरात

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 31 डिसेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवसेना पक्षाच्या नगरसेवकाने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र नेमका गुन्हा कोणावर दाखल याबाबत पोलिसांनी माहिती उघड केली नाही. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप जाधव यांच्या भावाने केला असून शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास कशिश पार्क येथे ही घटना घडली. जाधव यांना त्वरित ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (मलाही तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला, फडणवीसांनी थेट अधिकाऱ्याचं नावचं घेतलं) भाजपचे वागळे मंडळाचे सरचिटणीस प्रशांत जाधव हे आपल्या कामानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी काशिश पार्क येथे जात असताना शिवसेनेचे पक्षाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी आपल्या साथीदारांसह मारहाण केली असल्याची तक्रार जाधव यांनी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. (‘ छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, काही लोक जाणीवपूर्वक..’ अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं ) तर, आपण घटनास्थळी नव्हतो माझे नाव नाहक घेतले जात असून या प्रकरणा वागळे इस्टेट पोलीस तपास करत आहेत. सत्य लवकरच समोर येईल, असं माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी स्पष्ट केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या