जगातल्या सर्वांत श्रीमंत स्त्रीबद्दल माहिती आहे का? जगप्रसिद्ध फ्रेंच कॉस्मेटिक्स कंपनीची ती मालकीण आहे. Francoise Bettencourt Meyers असं या महिलेचं नाव…
जगातल्या सर्वांत श्रीमंत स्त्रीबद्दल माहिती आहे का? फ्रान्स्वा बेटनकोर्ट मायर हे तिचं नावं. एक ब्युटी प्रॉडक्ट्सच्या जगप्रसिद्ध कंपनीची ही मालकीण आहे. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत त्या जगातल्या सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
लॉरिएल कंपनीच्या या मालकीण बाईंची संपत्ती आहे 54.5 अब्ज डॉलर. भारतीय रुपयांमध्ये मोजले तर याची किंमत 3.52 लाख कोटी रुपये होईल. हा मार्च 2019 चा आकडा आहे. यात आणखी भर पडलेली असणार आहे.
लॉरिएल या फ्रेंच कंपनीचे संस्थापक यूझीन शूलर यांची बेटनकोर्ट ही नात. 1997 पासून त्या लॉरिएलच्या बोर्ड कमिटीत होत्या. लिलियन बेटनकोर्ट त्या वेळी कंपनीची प्रमुखपदी होत्या.
लिलियन बेटनकोर्ट या फ्रान्स्वा यांची आई. त्यांच्या मृत्यूनंतर लॉरिएलची मालकी फ्रान्स्वा बेटेनकोर्ट मायर याच्याकडे आली.
बेटनकोर्ट यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढते आहे. गेल्या वर्षी फोर्ब्सच्या यादीत त्या दुसऱ्या स्थानी होत्या.
फोर्ब्सने जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पहिले 15 पुरुष आहेत. 16 व्या स्थानावर लॉरिएलच्या बेटनकोर्ट आहेत.