दरवर्षी 1 जून हा दिवस ‘जागतिक दूध दिन’ (World Milk Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाचे सेवन आणि त्याचं महत्त्व याच्याशी संबंधित आहे. अन्न आणि कृषी संघटनेची स्थापना 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी केली होती. त्यानंतर जागतिक दूध दिन साजरा केला जाऊ लागला. 2022 मधील जागतिक दूध दिनाची थीम ‘हवामान बदल संकट’ आहे. दुधाची खासियत आपल्या सर्वांना माहीत आहे. असं असूनही अनेकांना दुधाची चव आवडत नाही म्हणून ते दूध पित नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्या 5 मिल्क शेकच्या रेसिपीबद्दल सांगत आहोत, त्या करून पाहिल्यानंतर तुम्हाला दुधाची चव आवडेल.
बदाम-केशर मिल्कशेक - जर तुम्हाला बदामाची चव आवडत असेल तर त्याचा मिल्कशेक बनवण्यासाठी वापर करा. 2 चमचे बदाम, 1 टीस्पून पिस्ता आणि 3-4 केशर दुधात मिसळा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आपण साखर खात नसल्यास त्याऐवजी मध वापरू शकता.
खजूर मिल्कशेक - खजूर शरीरातील साखरेची गरज पूर्ण करतात. तसंच, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झालंय. जर तुम्हाला दुधाची चव आवडत नसेल तर तुम्ही खजूर मिल्कशेक करून पाहू शकता. त्याची चव अप्रतिम होते.
केळी मिल्कशेक - दूध आणि केळी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. एकट्या दुधाची चव आवडत नसेल तर त्यात केळी घालून मिल्कशेक तयार करा. हवे असल्यास त्यात चिमूटभर दालचिनी पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाका.
चॉकलेट-हेझलनट मिल्कशेक - जर तुम्हाला दुधाची चव आवडत नसेल, तर मिल्कशेक बनवण्यासाठी चॉकलेट सिरप घाला. चवीसाठी तुम्ही हेझलनट किंवा आवडते ड्राय फ्रूट्स घालू शकता. चॉकलेट मिल्कशेकमध्ये चॉकलेट चिप्स आणि चिमूटभर कोको पावडर देखील घालता येते.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक - दुधासोबत स्ट्रॉबेरीची चव अप्रतिम असते. जर तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडत असेल तर दुधात मिसळून त्याचा शेक करा. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. शेक प्यायचा असेल तेव्हा त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स टाका आणि त्याचा आस्वाद घ्या.