JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Long Working Hours : कामाचे अधिक तास ठरतायेत जीवघेणे; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

Long Working Hours : कामाचे अधिक तास ठरतायेत जीवघेणे; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

प्रमाणापेक्षा जास्त वेळ काम केल्यानं (Long Working Hours) जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. असं WHO च्या एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

जाहिरात

ज्यांच्या मनात आपलं ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छा असते. ते लोक यशासाठी प्रयत्नही करत असतात. अशक्य शक्य करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. अशा वेळेस इतरांना मात्र त्यांच्या प्रगतीचा त्रास होत असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : सध्या कोरोना काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम (Work from home) करत आहेत. पण या कालावधीत काम करण्याच्या वेळेतही वाढ (Long Working Hours) झाली आहे.  लोक कित्येक तास ऑफिसचं काम करत बसतात. एकाच जागेवर सतत बसून राहिल्याने शरीराची दुखणी तर बळावतातच पण सोबतच आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. असेच अधिक तास काम करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) अभ्यास केला. ज्याचा धक्कादायक असा रिपोर्ट समोर आला आहे. प्रमाणापेक्षा जास्त वेळ काम केल्यानं  जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. हे संशोधन जागतिक आरोग्य संघटना (WHO)आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी संयुक्तपणे केलं आहे.  संशोधकांनी यासाठी 194 देशांमधून डेटा जमा केला होता. यात आग्नेय अशिया आणि पश्चिम प्रशांत महासागराच्या भागातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यात जपान ऑस्ट्रेलिया आणि चीनचा देखील समावेश होता. यूएस न्यूज च्या वृत्तानुसार, या जागतिक स्तरावरील संशोधनात असं दिसून आलं आहे की 2016 मध्ये कामकाजाच्या जास्त कालावधीमुळे जवळपास 7,45,000 लोकांचा हार्ट स्ट्रोक (Heart Stroke) किंवा हृदयाच्या अन्य आजारांमुळे मृत्यू झाला आहे. ही सर्व लोकं प्रमाणापेक्षा अधिक वेळ काम करत होती. दीर्घकाळ कामकाज केल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 2000 सालाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढल्याचंदेखील या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. एकूण मृत्यूंपैकी 72 टक्के मृत्यू हे मध्यमवयीन आणि वयोवृद्ध पुरुषांचे झाले. हे वाचा -  DOG ही सांगू शकतो तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; काही सेकंदातच करतो निदान या अहवालानुसार,जर तुम्ही एका आठवडाभरात 35 ते 40 तासांच्या तुलनेत 55 तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केलं तर स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी तर हार्ट डिसीजचा (Ischemic Heart Disease) धोका 17 टक्क्यांनी वाढतो. हा सर्व डेटा 2000 ते 2016 दरम्यानचा आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे रिमोट वर्किंगला (Remote Working) मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे. जागतिक आर्थिक मंदीचा धोका लक्षात घेऊन कामाच्या तासांमध्ये 9 टक्क्यांनी वाढ होणं अपेक्षित आहेत. हे वाचा -  अरे बापरे! मांजर पाळणाऱ्या चिमुकलीचे अचानक गळू लागले केस; टक्कल करण्याची ओढावली वेळ जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, पर्यावरण, हवामान बदल आणि आरोग्य विभागाच्या संचालिका मारिया नियारा यांनी सांगितलं की, दर आठवड्यात 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम केल्यास आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आम्हाला वाटतं की या माहितीसह कर्मचाऱ्यांचे अधिक संरक्षण आणि कृतीस प्रोत्साहन द्यावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या