बनावट कोरोना लसीकरणापासून (Fake Corona Vaccination) तुम्ही सावध कसं राहाल?
एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर जोर देण्यात येत आहे, तर दुसरीकडे बनावट लसीकरणाचेही प्रकार समोर येत आहेत. एकापाठोपाठ एक राज्यांतून अनेक बातम्या आल्या आहेत, ज्यात बनावट लस लावणाऱ्या टोळ्या समोर आल्या आहे.
बरेच लोक बनावट लशीपासून खरोखर आजारी पडले आहेत, तर पुष्कळांना भविष्यात त्याचा परिणाम होण्याची भीती वाटते. परंतु काही सोप्या पद्धतींद्वारे बनावट लशी घेणं टाळता येऊ शकतं.
कोणतीही सोसायटी किंवा कॉलनी आपल्या भागात खासगी लस शिबिर उभारण्याचा विचार करत असेल तर निवासी कल्याण संघटनेने स्थानिक अधिकाऱ्यांसह पोलिसांना कळवावं. जोपर्यंत त्यांची संमती मिळत नाही, तोपर्यंत तिकडून लस घेऊ नये.
शक्य झाल्यास आरडब्ल्यूए किंवा कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वत: पुढे येऊन आपल्या भागात लसीकरण शिबिरे आयोजित करण्यासाठी खासगी रुग्णालयांशी संपर्क साधावा. याद्वारे कोणतीही टोळी बनावट लस लावण्याच्या प्रक्रियेत असल्यास खासगी रुग्णालयातूनच त्यांचा अशा टोळीशी काही संबंध नसल्याची माहिती मिळेल.
लस घेण्यासाठी सर्व लोकांनी कोविन पोर्टलवर आपली नावं नोंदवावी. तसंच कोविन पोर्टलवर नोंदणीकृत नसलेल्या अशा कोणत्याही केंद्रावर जाऊ नका.
या व्यतिरिक्त ही लस मिळाल्यानंतर लोकांनी केंद्रात त्यांच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्राची मागणी केली पाहिजे. जर कोणी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला, किंवा नंतर देऊ असं म्हणाले तर ते संशयास्पद असू शकते. म्हणजेच ही बनावट लस असू शकते.
कोरोना विषाणूची लस घेतल्यानंतरही प्रत्येकाला ताप, डोकेदुखी किंवा डोकेदुखी सारखीसमस्या नसली तरी बहुतेक लोकांना 1 ते 2 दिवस थोडा त्रास जाणवतो. पण लस घेतल्यानंतर कोणतीच समस्या जाणवत नसेल तर कदाचित ती लस बनावट असू शकते. त्याच्या संशयाचा अहवाल स्थानिक प्रशासनाला द्या.