ईशान्येकडील राज्यातील (Weird dishes of North East India) लोकांचे खाद्यपदार्थ खाल तर चक्रावून जाल. ते डुक्कर, बेडूक, खेकडे, कुत्रा यापासून बनवलेले खाद्यपदार्थ खातात.
भारतासारख्या खंडप्राय देशात अस म्हणतात की, मैलांवर भाषा आणि खाद्यपदार्थ बदलते. भारताच्या विविध राज्यात एकच पदार्थ विविध प्रकारे बनवला जातो. जसा प्रदेश तसा वेषही, तसेच खायचे पदार्थही बदलतात. मात्र, ईशान्येकडील राज्यांमध्ये काही भयानक गोष्टीही खाल्लया जातात. त्याविषयी जाणून घेऊया
जादोह : मेघालयातील खासी जातींमध्ये जादोह हा (Jadoh) खाद्यपदार्थ खाल्ला जातो. या डिशमध्ये भातासोबत डुकराचे रक्तही असते. आणि त्यासोबत मांस (Rice with blood of pig) शिजवले जाते. याशिवाय डुक्कर तसेच कोंबडीचे रक्त एकत्र करून शिजवले जाते. पुलावसारखी चव असलेली डिश तेथे खूपच लोकप्रिय आहे.
दो खिलेह : जादोह सोबत दोह खिलेह ही डिशही ईशान्येकडील राज्यात आवडीने खाल्ली जाते. यात कांदा तसेच डुक्करांचे मांस एकत्र शिजवले जाते. यात डुक्करांचे डोकेही (Pig Brain with pork and onion salad) टाकले जाते.
नागालँड, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमधील नागरिक हे कुत्र्यांचे मांस सुध्दा खातात. याशिवाय ते डुक्कर, गाय खेकडा आणि हत्तीचेही मांसही तेवढ्यात आवडीने खातात.
बेडकाचे पाय : सिक्कीम येथील लेपचस जातीतील लोक हे बेडकाचा पाय खातात. याला चिकनप्रमाणे भाजले जाते. हा पदार्थ पोटाशी संबंधित विकार बरे होतात, अशी तेथील लोकांची समजूत आहे.
एरी पोलू : देशाच्या अनेक भागांमध्ये रेशमाच्या किड्यांची पैदास केली जाते. रेशीमच्या किड्यापासून तयार होणाऱ्या सिल्क साड्यांना बाजारात चांगलीच मागणी असते. मात्र, आसाममध्ये साडीपेक्षा खाण्यासाठी या किड्यांचा उपयोग केला जातो. त्यापासून एरी पोलू ही डिश बनवली जाते.
फान फ्यूट : देशातील प्रत्येक घरात बटाट्यापासून अनेक डिश बनवल्या जातात. मात्र ईशान्येकडील राज्यात खाल्ली जाणारी ही डिश सडलेल्या बटाट्यापासून बनवली जाते. याला फान फ्यूट असे म्हणतात.
नहखम : मेघालयातील गारो जातीतील लोक नहखम (Nahkham in Meghalaya) ही डिश खातात. ही डिश सुकलेले मासे, भाजी यापासून बनवलेल्या राखेपासून बनवली जाते. एखादी वस्तू जाळल्यानंतर ही राख बनते. याची चव सडलेल्या पदार्थाप्रमाणे लागते.