सन्माईक चमकण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी वापरू शकता.
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : सुंदर घर हे तर प्रत्येकाचं स्वप्न (Dream) असतं. आपण खुप प्रेमाने आपलं घर सजवतो, विविध रंगांनी, पडद्यांनी घरांची सजावट करतो. महागडे फर्निचर, शोच्या वस्तू घरात आणतो. बऱ्याच घरांमध्ये सनमाईक लावलेलं फर्निचर (Sun mic Furniture) वापरलं जातं. हे फर्निचर सुरूवातील सुंदर दिसतं पण जसजस त्याची चमक कमी होऊन डाग (StainOn Furniture) पडायला लागतात तेव्हा त्याची जास्त काळजी (Care) घ्यावी लागते. स्वच्छता (Cleaning) ठेवली नाही तर, त्याची त्याची चमक (Shine) कमी होते. सन्माईक लावलेलं फर्निचर चांगलं राहण्यासाठी त्यावर डाग पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. पाहूयात सन्माईक चमकदार ठेवण्यासाठी काय करायला हवं. व्हिनेगर आणि पाण्याचा वापर सन्माईक चमकण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी वापरू शकता. अर्धा ग्लास पाणी आणि तितकेच व्हिनेगर एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि फर्निचरवर स्प्रे करा. नंतर कोरड्या सुती कापडाने हलक्या हाताने पुसून घ्या. यामुळे सन्माईकवरील डाग दूर होतील आणि शाईनही परत येईल. ( स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी ) टार्टर आणि लिंबाचा रस कधीकधी सन्माईकवर अनेक प्रकारचे डाग पडतात. खास करून टेबलवर सन्माईक असेल तर, त्यावर चहा,जेवण किंवा काही चिकट डाग पडले असतील तर, ते काढण्यासाठी आणि चमक परत आणण्यासाठी टार्टर आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि टार्टर समान प्रमाणात एकत्र करा. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून सन्माईकवर स्प्रे करा आणि 5 मिनिटं तसच राहू द्या. सुती कापडाने हलक्या हाताने स्वच्छ करा. ( गर्भावस्थेत एक गोळी करेल घात; व्यंग असलेलं बाळ येईल जन्माला ) सोडा आणि डिश वॉश 1 ग्लास पाण्यात 1 चमचा कॉस्टिक सोडा आणि 1 चमचा लिक्विड डिश वॉश मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि सन्माईकवर फवारणी करा आणि नंतर मऊ सूती कापडाने हलक्य हाताने पुसून टाका. स्प्रे बॉटल नसेल तर, या मिश्रणात सूती कापड बुडवून, पिळून त्या कापडाने सन्माईक स्वच्छ करा. ( आता शाळेतही Period leave; शिक्षिका, विद्यार्थिनींना दिलासा मिळणार? ) क्लीनिंग सॉल्यूशन बरेच लोक ड्रेसिंग टेबल्स,सेंटर टेबल आणि खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी कोलीन प्रकारातलं क्लीनिंग सॉल्यूशन वापरतात. या सोल्युशनचा वापर फर्निचरवरचं सन्माईक चमकवण्यासाठी होऊ शकतो. क्लीनिंग सॉल्यूशन सन्माईकवर लावल्यानंतर कोरड्या कापडाने घासून घ्या. सन्माईक काचे सारख चमकायला लागेल.