JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / मोठी बहीण म्हणून खेळलो, तीच आपली खरी आई; 21 वर्षांनी कळली ओळख!

मोठी बहीण म्हणून खेळलो, तीच आपली खरी आई; 21 वर्षांनी कळली ओळख!

या प्रसिद्ध टिकटॉकरची कहाणी तुम्हालाही ऐकायला विचित्र वाटेल. त्याने स्वतःच video च्या रूपात उलगडली आहे. इतकी वर्ष जिला आपली मोठी बहीण समजत होता ती त्याची आई होती.

0106

न्यूयॉर्कच्या शेम ग्रीफ्स या प्रसिद्ध टिकटॉकरची स्वतःची धक्कादायक life story शेअर केली आहे. त्याच्या आयुष्यातील एक सत्य जगाला सांगितलं आहे. या मुलाने सांगितले की, 21 वर्षांपासून ज्या महिलेला तो त्याची ती मोठी बहीण समजत होता ती त्याची मोठी बहीण नव्हे तर त्याची स्वतःची आई आहे.

जाहिरात
0206

शेम ग्रिफ्सने त्याच्या टिकटॉक अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला सर्वाना ही माहिती दिली. शेम म्हणाला, 'माझ्या मोठ्या बहिणीशी माझे खूप चांगले नाते आहे. चांगली बाँडिंगही आहे. इतर भाऊ-बहिणींप्रमाणेच आम्हीसुद्धा मस्ती मजाक करत असतो'

जाहिरात
0306

शेम म्हणाला, 'मला काही दिवसांपूर्वीच समजलं की, इतकी वर्षं जिला मी माझी मोठी बहीण समजत होतो, ती माझी आई आहे. अगदी लहान वयातच माझी आई गरोदर झाली आणि तिने मला जन्म दिला, हे सांगताना जरा विचित्रच वाटतं आहे.

जाहिरात
0406

शेमने सांगितले की 'माझ्या आईला गर्भपात करायचा नव्हता. माझ्या जन्मासंदर्भात सर्व प्रकारच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीही ती तयार होती.'

जाहिरात
0506

शेम पुढे म्हणतो, 'माझ्या आजीने माझ्यावर आईसारखंच प्रेम केलं. कदाचित मी 20 वर्षांचा झाल्यावरच मला सत्य सांगण्याची माझ्या कुटुंबाची योजना होती. '

जाहिरात
0606

शेवटी शेम म्हणाला, 'माझ्या आईने मला माझी मोठी बहीण म्हणूनही तेवढंच प्रेम केलं. माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. कुटुंबातील प्रत्येक सदस्य माझ्यावर खूप प्रेम करतो'.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या