JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हा' मासा, मजबूत हाडांसह होतील अनेक फायदे

इम्युनिटी वाढवण्यासाठी खा 'हा' मासा, मजबूत हाडांसह होतील अनेक फायदे

व्हायरल इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी इम्युनिटी चांगली असणं महत्त्वाचं आहे. टूना मासा खाण्याने इम्युनिटी स्ट्राँग होते.

0106

मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात टुना फिश म्हणजेच कुपा मासा खाण्याने होणारे फायदे.

जाहिरात
0206

टुना मासा - टुना मासा एक विशेष प्रकारचा मासा आहे, ज्याला कुपा मासा देखील म्हटलं जातं. इतर माशांपेक्षा याचा आकार वेगळा असतो. समुद्राच्या पाण्यामध्ये आढळणारा हा मासा चवीला तर चांगला असतो, शिवाय शरीराला देखील लाभदायक आहे. या माशाने अनेक आजार दूर पळतात.

जाहिरात
0306

वजन कमी होतं - वजन कमी करायचं असेल, तर टुना म्हणजेच कुपा मासा खावा. या माशाचं ऑईल देखील वजन कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे कंबर दुखीच्या त्रासामध्ये आराम मिळतो. शिवाय यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते.

जाहिरात
0406

मजबूत हाडांसाठी - हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी टुना माशांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं मजबूत करायची असतील, तर टुना मासा नेहमी खावा.

जाहिरात
0506

डोळ्यांसाठी फायदेशीर हाडांबरोबर शरीराचे इतर अवयव देखील निरोगी असणं आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी टुना मासा खायला हवा. यामुळे नजर चांगली होते.

जाहिरात
0606

निरोगी हृदयासाठी टुना मासा खाल्ल्यामुळे हृदयालाही फायदा होतो. टुना माशामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे हृदय रोगाची भीती कमी होते. मासांहारी लोकांनी आहारात नियमित टुना माशाचा समावेश करावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या