JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / हे सुंदर लेहेंगे खास सावळ्या मुलींसाठी, कार्यक्रमात सर्वांची नजर असेल तुमच्यावरच

हे सुंदर लेहेंगे खास सावळ्या मुलींसाठी, कार्यक्रमात सर्वांची नजर असेल तुमच्यावरच

सौंदर्य केवळ त्वचेच्या टोनमध्ये नसतं. तर, ते अॅपिअरन्स, स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वातून दिसून येतं. जर तुम्ही तुमच्या दिसण्याची विशेष काळजी घेतली तर, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुंदर दिसू शकता. आज आपण सावळ्या मुलींसाठी कोणत्या प्रकारचे लेहेंगा ट्रेंडमध्ये आहेत, याबद्दल बोलू. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, सब्यसाची मुखर्जी आणि अनिता डोंगरे यांनी डिझाइन केलेले हे खास लेहेंगा बॉलीवूडच्या लग्न समारंभात अनेक अभिनेत्रींनी सुंदरपणे कॅरी केले आहेत. हे डिझायनर लेहेंगा दिसायला अतिशय सुंदर आहेत आणि ते डस्की स्किन टोनसाठी परफेक्ट म्हणता येतील.

0105

अनिता डोंगरेचा हा डिझायनर लेहेंगा डस्की स्किनसाठी योग्य आहे. त्यावर पांढर्‍या बेसवर गुलाबी आणि राखाडी रंगात सुंदर काम करण्यात आलं आहे. या लेहेंग्यासोबत जर तुम्ही मोत्यांचा हार किंवा कानातले घातले तर, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील. (Image : Instagram/anitadongre)

जाहिरात
0205

पीच ग्रीन बेस आणि सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हा लेहेंगा सावळ्या मुलींचं सौंदर्य वाढवू शकतो. हा लेहेंगा दिवसाच्या कार्यक्रमांसाठीही घालता येईल. (Image : Instagram/anitadongre)

जाहिरात
0305

लाल रंगाचा लेहेंगा सावळ्या मुलींना खूप सुंदर दिसतो. तुम्ही लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणार असाल तर, बिनधास्त मनाने असा लाल रंगाचा लेहेंगा खरेदी करू शकता. (Image : Instagram/sabyasachiofficial)

जाहिरात
0405

हल्ली लेहेंग्यात मेटॅलिक कलर खूप ट्रेंडमध्ये आहेत. सावळ्या स्किन टोनवर हा रंग खूप सुंदर दिसतो. डस्की स्किन टोन असलेल्या मुली मनीष मल्होत्रांच्या या डिझायनर लेहेंग्यासारखे लेहेंगा वापरू शकतात. या लेहेंग्यात निळा आणि मेटॅलिक रंग सुंदरपणे पसरवला गेला आहे. (Image : Instagram/manishmalhotraworld)

जाहिरात
0505

जर तुम्ही रात्रीच्या फंक्शनसाठी लेहेंगा शोधत असाल, तर तुम्ही या प्रकारच्या इंडो वेस्टर्न स्टाईल लेहेंग्यापासून प्रेरणा घेऊ शकता. हे देखील मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केले आहेत. (Image : Instagram/manishmalhotraworld)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या