JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Tokyo Olympic : Bronze मेडल जिंकल्यानंतर PV Sindhu ने का खाल्लं केळं?

Tokyo Olympic : Bronze मेडल जिंकल्यानंतर PV Sindhu ने का खाल्लं केळं?

पी. व्ही. सिंधूने मेडल जिंकल्यानंतर केळं खाताना दिसली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकियो, 01 ऑगस्ट : टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला (PV Sindhu) ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव केला.  पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये 2016 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सिंधूच्या मेडल जिंकण्यासह तिचा आणखी एक वहिडीओ व्हायरल होतो आहे, तो म्हणजे ती मैदानात केळं खाताना दिसली. सिंधूने मेडल जिंकल्यानंतर लगेच केळं खाल्लं (PV Sindhu eat banana). त्यामुळे तिच्या जिंकण्यासह तिच्या या खाण्याचीही (PV Sindhu diet) चर्चा होते आहे.

संबंधित बातम्या

ऑलिम्पिक वेबसाईट वरील माहितीनुसार  सिंधू महिनाभर आधीच आपला डाएट प्लॅन तयार करते. कार्ब्स आणि प्रोटिन्सचा योग्य बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिला ऊर्जा आणि मजबुती मिळेल. शी द पिपल च्या रिपोर्टनुसार खेळानंतर रिकव्हर होण्यात सिंधूला कशाची मदत होते, तर ती केळं, प्रोटिन शेक आणि स्नॅक्स बारची. काय आहेत केळ्याचे फायदे इन्स्टं****ट एनर्जी मिळते केळं इन्स्टंट एनर्जी बूस्टर आहे. त्यामुळे त्याला कम्प्लिट फूड मानलं जातं. केळं खाल्ल्यामुळे शरीरात ग्लुकोज लेव्हल वाढते आणि आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागतं. महिलांनी सकाळी केळं खाल्लं तर, त्यांना दिवसभर उत्साही वाटतं राहतं. यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात. स्ट्रेस लेव्हल होते कंट्रोल केळ्यामध्ये पोटॅशियम असतं. त्यामुळे तणाव कमी होतो पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण करणारे हार्मोन्स म्हणजेच कोर्टिसोल नियंत्रित करतं. यामुळे जेव्हाही तणाव वाटत असेल तेव्हा एक केळं खावं. केळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स,पोटॅशियम,व्हिटॅमिन बी 6, प्री-बायोटिक फायबर आणि मॅग्नेशियम असतं. जे ब्‍लड शुग कंट्रोल करण्याबरोबर मूडही चांगला करतं. हे वाचा -  सुवर्ण स्वप्न भंगल्यावर सिंधू रडली, पण वडिलांच्या VIDEO ने मिळवून दिलं ब्रॉन्झ एका रिसर्चनुसार, केळं खाल्ल्यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत मिळते. केळ्यात ट्रिप्टोफॅन नावाचं एक केमिकल असतं. ट्रिप्टोफॅन आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचं केमिकल आहे. कारण हे सेरोटोनिन मिळवण्याचं काम करतं. सेरोटोनिन हा एक न्यूरोट्रान्समिटर आहे जे मेंदूला आनंदी राहण्याचा संदेश देत असतं. व्हिटॅमिन्सनी युक्त केळ्यात अनेक प्रकारचे विटामिन असतात. नियमित केळं खाल्ल्याने विटामिन सीची कमतरता तर कमी होतेच शिवाय विटामिन बी6 आणि विटामिन सी हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला जेवढी विटामिन सी ची आवश्यकता असते त्यातील 15 टक्के विटामिन हे फक्त केळ्यातून मिळू शकतं. आयर्न केळ्यात मोठ्या प्रमाणात आयन ही असतं. त्यामुळे अॅनेमियापासून वाचण्यासाठी केळं फार उपयुक्त आहे. अॅनेमियात शरीरातील लाल पेशी आणि हीमोग्लोबिनचा स्तर कमी होतो. केळ्यात असलेले विटामिन बी6 हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा नियंंत्रणात राहायला मदत होते. अॅनेमियाच्या रुग्णांना यामुळे फार आराम मिळतो. सिंधूचा डाएट कसा असतो? ब्रेकफास्टला ती प्रोटिन घेण्यावर भर देते. त्यामुळे दूध पिते, अंडी घाते. सकाळी ती फळं खाते. ट्रेनिंगदरम्यानही ती थोडं थोडं खाते. यावेळी ती सुकामेवा खाते आणि ताजंतवानं राहण्यासाठी एनर्जी ड्रिंक पिते.  दुपारी आणि रात्रीच्या जेवणात ती मांस, भाज्या आणि भात खाते.  जंक फूड आणि आईस्क्रिम, चॉकलेट असे गोड पदार्थ ती पूर्णपणे टाळते. हे वाचा -  कोरोनाव्हायरसनंतर राज्यात Zika virus चं संकट; काय आहेत याची लक्षणं? तसंच दर महिन्याला ती ब्लड टेस्टही करते जेणेकरून त्यानुसार आहारात बदल करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या