JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / वैवाहिक आयुष्यात आनंद आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांनी जरूर खावी वेलची, वाचा फायदे

वैवाहिक आयुष्यात आनंद आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांनी जरूर खावी वेलची, वाचा फायदे

वेलची केवळ सुवासिक मसाला म्हणून जेवण चविष्ट बनवण्यासाठीच उपयुक्त नाही तर या वेलचीचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत. वेलची पावडर काही प्रकारच्या चहा आणि पदार्थांमध्ये वापरली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का की वेलची तुमच्या आयुष्यातील लैंगिक समस्या सोडवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, वेलचीमुळे लैंगिक समस्या दूर होतात. आजकालचे टेन्शन, बिझी लाईफ स्टाइल, रेडी टू खाण्याच्या सवयी यामुळे लोकांची नैसर्गिक तयार लैंगिक क्षमता कमी होत आहेत आणि लैंगिक समस्या वाढत आहेत. विशेषत: बहुसंख्य लोकांमध्ये अपत्यहीनता म्हणजे बाळ न होण्याची समस्या दिसून येते. आज आम्ही तुम्हाला वेलची तुमच्या आयुष्यातील लैंगिक समस्या कशाप्रकारे सोडवू शकते याबद्दल माहिती देणार आहोत.

0106

वेलचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस आढळतात. जे निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे काही लैंगिक समस्या असणाऱ्या पुरुषांनी याचे सेवन नक्की करावे. पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी किमान 2 वेलची खाव्या. रोज वेलची खाल्ल्याने पुरुषांमधील नपुंसकता दूर होते. कारण वेलची लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करते. तुम्ही पाणी किंवा दुधासोबत वेलची घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला याचा फायदाच मिळेल.

जाहिरात
0206

शुक्राणूंची कमी संख्या हे अनेक पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे मुख्य कारण आहे. दररोज 1 ते 2 वेलची खाल्ल्याने काही प्रमाणात शुक्राणूंची संख्या वाढू शकते. यामुळे नपुंसकत्वासारख्या लैंगिक समस्या दूर व्हायला मदत होते.

जाहिरात
0306

स्टॅमिना वाढवण्यासाठी वेलची तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. यामुळे दाम्पत्य जीवनासाठी वेलची उपयुक्त असल्याचे दिसते. वेलची तुमचा मूड सुधारण्याचेही काम करते. वेलचीचा सुगंध तणाव दूर करतो. त्यामुळे लैंगिक समस्या असल्यास वेलचीचे सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ञदेखील देतात.

जाहिरात
0406

लैंगिक समस्या सोडवण्यासोबतच वेलची वजन कमी करण्यासही मदत करते. वेलचीमधील उष्णता आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वितळवते. यासाठी रोज रात्री एक वेलची खावी. यामुळे वजन कमी होण्याबरोबरच वेलची शरीरातील कचरा आणि हानिकारक बॅक्टेरिया बाहेर काढून टाकण्यासही मदत करते.

जाहिरात
0506

बद्धकोष्ठता ही आणखी एक समस्या आहे. जी आजकाल बहुतेक लोकांना भेडसावत आहे. चहा किंवा इतर कोणत्याही स्वरूपात घेतलेली असो. वेलची पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते. वेलची गॅसची समस्या दूर करते.

जाहिरात
0606

वेलची केस तुटणे आणि गळणे या समस्या दूर करण्यास मदत करते. वेलची केस जाड, मजबूत आणि follicles मजबूत ठेवण्यास मदत करते. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासदेखील वेलची उपयुक्त ठरते. वेलची त्वचेवरील काळे डाग कमी करते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या