JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Work From Home मध्ये वजन कमी करण्याची चांगली संधी; वाचा हे सोपे उपाय!

Work From Home मध्ये वजन कमी करण्याची चांगली संधी; वाचा हे सोपे उपाय!

सध्या कोरोनामुळं अनेकजण घरुनच काम करत आहेत. तर अशात वाढलेलं वजन आपण कसं कमी करू शकतो चला पाहूयात…

0110

पहिले बाहेरचं जेवण, जंक फूड हे कटाक्षाने टाळले जायचे. त्याऐवजी घरचा सकस भोजन घेण्यावर जास्त भर दिला जाई. पण आता मात्र सर्रास हॉटेल मध्ये जेवण, जंक फूड खाल्ल जात आणि याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन.

जाहिरात
0210

1) नियमित व्यायाम करा: वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि पहिला उपाय. खूपदा आपण ठरवतो की मी उद्यापासून व्यायाम करेल पण तो उद्या मात्र कधीच उजाडत नाही आणि तुमचं वजन देखील कमी होत नाही. त्यामुळे आजपासूनच व्यायामाला लागा.

जाहिरात
0310

2) उठल्यानंतर नीट रुटीन पाळा: सकाळी उठल्यावर तुमचं एक ठरलेलं रुटीन हवं. सकाळच्या वेळी चहा, कॉफी अशी गरम पेय टाळा. त्यापेक्षा ग्रीन टी, किंवा गरम पाण्यात मध, लिंबू, आलं टाकून ते प्या.

जाहिरात
0410

3) डाएट चार्ट बनवा: वजन वाढण्याच प्रमुख कारण म्हणजे कुठल्याही वेळी काहीही खाण. तुमच्या नाश्त्याची, जेवणाची वेळ ठरवून घ्या. त्याचसोबत तुमच्या शरीरासाठी जेवढे प्रोटीन आवश्यक आहे ते सगळे लक्षात घेऊन तुमचा स्वतःचा असा प्रत्येक दिवसानुसार डाएट चार्ट बनवा.

जाहिरात
0510

4) जंक फूड टाळा: पिझ्झा, बर्गर, वेफर्स इ. जंक फूड शक्य होईल तितक टाळा. या पदार्थांमध्ये खूप जास्त तेल असत. आणि ह्याने तुमचं वजन अजून जास्त झपाट्याने वाढू शकत.

जाहिरात
0610

5) स्वतःला बक्षीस दया: जर कोणी छान काम केलं तर आपण त्याला बक्षीस देऊन त्याचं कौतुक करत असतो. तसच जर तुम्ही महिनाभर दररोज नियमित व्यायाम केला, रुटीन पाळलं, डाएट चार्ट फॉलो केला आणि जंक फूड देखील टाळलं तर स्वतःच स्वतःसाठी एखादी हवी असणारी आवडीची गोष्ट गिफ्ट करा.

जाहिरात
0710

6) लवकर जेवा: संध्याकाळच जेवण हे लवकर घेत चला. त्याने तुमची पचनशक्ती सुधारेल आणि वजनवाढीच संकट सुद्धा टळेल.

जाहिरात
0810

7) अन्न सावकाश आणि चावून खा: खूप लोकांना घाई घाईने जेवायची सवय असते. अशाने खाल्लेलं अन्न हे नीट पचत नाही आणि ते पचवण्याचा अतिरिक्त ताण हा आतड्यांवर पडतो. पचनसंस्थेवर सुद्धा त्याचा ताण पडतो.

जाहिरात
0910

8) भरपूर पाणी प्या: आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसातून दोन ते चार लीटर पाणी हे प्रत्येकाने प्यायलाच हवे. पाण्यामुळे वजन आटोक्यात ठेवायला सुद्धा खूप मदत होते.

जाहिरात
1010

9) हिरव्या भाज्या जास्त खा: तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, फळ, यांचा जास्तीत जास्त समावेश करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या