Tips to deal with fever in child : बदलत्या ऋतूमध्ये लहान मुलांना ताप येणे ही सामान्य बाब आहे. तुम्ही नवीन पालक असाल आणि तुमचे मूल आजारी पडल्यावर तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. किड्स हेल्थच्या मते, कधीकधी ताप येणे मुलांसाठी फायदेशीर असते. यामुळे मुलाचे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. वास्तविक, मेंदूतील हायपोथालेमस (hypothalamus) शरीराचे तापमान वाढवण्याचे आणि कमी करण्याचे काम करते. संशोधनात असे आढळून आले आहे की, जेव्हा शरीरावर बाह्य जीवाणूंचा हल्ला होतो तेव्हा हायपोथालेमस शरीराचे तापमान वाढवते, जे संसर्गाचे संकेत असतात. त्यामुळे मूल आजारी असेल किंवा ताप असेल तर काळजी करण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांची काळजी घ्या. पावसाळ्यात मुलाला कसे निरोगी ठेवायचे ते जाणून घेऊया.
तापमान मोजा - जर तुमच्या मुलाचे शरीर गरम वाटत असेल तर त्याच्या शरीराचे तापमान थर्मामीटरने मोजा. त्यामुळे तापमान वाढले आहे की नाही हे कळण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही मॅन्युअल किंवा डिजिटल थर्मामीटर वापरू शकता. जे काही तापमान असेल ते दिवसभरात लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला तर तुम्ही सर्व माहिती देऊ शकता.
डॉक्टरांशी संपर्क साधा - मुलाच्या शरीराचे तापमान सतत वाढत असेल तर आपण ताबडतोब डॉक्टरांना भेटावे. तुम्हाला हवे असल्यास, जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्या. कोरोनाबाधित क्षेत्र असेल तर तुम्ही फोनवरूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आधी स्वत: निरीक्षण करा - कधीकधी उष्णतेमुळे किंवा कपड्यांमुळे तापमान सामान्यपेक्षा जास्त जाणवू शकते. अशा परिस्थितीत, आपले हात पाय धुवा आणि मुलास मऊ आणि हलके कपडे घाला. त्याला विश्रांती द्या आणि काही वेळाने तापमान पहा.
आहाराची काळजी घ्या - जर मुलाला सौम्य ताप असेल तर त्याला जबरदस्तीने खायला देऊ नका. त्याला फक्त सूप, रस, डाळीचे पाणी दिले तर बरे होईल. त्यामुळे त्यांना बरे वाटेल आणि आराम वाटू शकतो.
स्पंज बाथ करा - जर औषध दिल्यानंतरही मुलाचे शरीर गरम राहत असेल आणि तापमान वाढत असेल तर तुम्ही त्याला थंड स्पंजने आंघोळ द्यावी. यासाठी सामान्य पाणी घेऊन त्यात टॉवेल बुडवून पिळून घ्या. या कपड्याने मुलाचे शरीर पूर्णपणे पुसून टाका. रेफ्रिजरेटरचे पाणी वापरू नका.
आराम मिळेल याची काळजी घ्या - मुलाचा ताप बरा होण्यासाठी अनेक पालक पंखे, एसी बंद करून त्याला भरपूर कपडे घालायला लावतात. असे करू नका. त्याच्या आरामाची काळजी घेतली तर बरे होईल. यासाठी पंखा बंद करण्याऐवजी तो कमी करा जेणेकरून मुलाला आरामात झोपता येईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)