JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / तुमचं वय 40 च्या आत आहे? या सुंदर शहरात स्थायिक होण्यासाठी मिळत आहेत 25 लाख!

तुमचं वय 40 च्या आत आहे? या सुंदर शहरात स्थायिक होण्यासाठी मिळत आहेत 25 लाख!

इटलीतलं स्थानिक सरकार या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी प्रत्येकाला 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे, हीच अट आहे.

0108

इटली हा देश भूमध्य समुद्राच्या सान्निध्याने निसर्गसमृद्ध आहे. अशा रम्य प्रदेशात राहायला कुणाला नाही आवडणार. मग हा देश आमंत्रणं देऊन गावांची लोकसंख्या का वाढतोय?

जाहिरात
0208

इटलीत सध्या वृद्धांचीच लोकसंख्या अधिक आहे. गावांमध्ये रोडावलेली तरुणाईची संख्या हा तिथे चिंतेचा विषय आहे.

जाहिरात
0308

इटलीतल्या कॅलब्रिया प्रदेशातील लोकसंख्या तर खूप कमी झाली आहे. म्हणूनच सरकारने इतर देशातील लोकांना इथे स्थायिक होण्याची विशेष ऑफर दिली आहे.

जाहिरात
0408

या शहरात स्थायिक होण्यासाठी सरकार प्रत्येकाला 28 हजार युरो म्हणजेच सुमारे 24.76 लाख रुपये देणार आहे .

जाहिरात
0508

स्थायिक होण्यासाठी काही अटी मान्य कराव्या लागतील. त्यातली महत्त्वाची अट आहे वय चाळिशीच्या आत असणं.

जाहिरात
0608

metro.co.uk च्या वृत्तानुसार, कॅलाब्रिया प्रांताचं नागरिक होण्यासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असावं. अर्ज केल्यानंतर 90 दिवसात येथे शिफ्ट व्हावं लागेल अशी एक अट आहे.

जाहिरात
0708

अर्जाची प्रक्रिया काही आठवड्यांत कॅलाब्रिया प्रदेशाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू केली जाईल

जाहिरात
0808

कॅलाब्रिया प्रदेशातील 75 टक्के पेक्षा जास्त शहरांमध्ये सध्या 5000 हून कमी लोक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, इटलीमधील अनेक शहरांना घटत्या लोकसंख्येच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या