JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / सावधान! या सवयींनी तुम्ही पत्नीच्या नजरेतून उतराल

सावधान! या सवयींनी तुम्ही पत्नीच्या नजरेतून उतराल

लग्नानंतर नातं टिकवायचं असेल तर दोघांनी आपल्या वागण्यात बदल करावे लागतात.

0107

लग्नानंतर नातं टिकवायचं असेल तर दोघांनी आपल्या वागण्यात बदल करावे लागतात. पतीनं आपल्या पत्नीसोबत वागताना या गोष्टी टाळाव्यात.

जाहिरात
0207

पाठीमागे वाईट बोलणं - आपल्या जोडीदारामागे तिच्यावर टीका करणं चुकीचं आहे. जोडीदाराचं एखादं वागणं आवडलं नाही, तर सरळ सांगा. पण तिच्या मागे वाईट बोलू नका.

जाहिरात
0307

नको तेवढी दखल - सुखी लग्नासाठी एकमेकांना स्पेस देणं महत्त्वाचं असतं. पत्नीच्या प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार दाखवणं, तिच्यावर संशय घेणं कुठल्याही नात्याला मारक ठरतं.

जाहिरात
0407

पत्नी रोबोट नाही - अनेक पुरुष पत्नीला रोबोट समजतात. तिला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. घरात प्रवेश केल्या केल्या पत्नीनं आईला मदत करावी, सगळी कामं करावी अशीही अपेक्षा पतीची असते. त्यानं नातं बिघडू शकतं.

जाहिरात
0507

प्रेम व्यक्त न करणं - अनेकदा पुरुष पत्नीला गृहित धरतात. लग्नानंतर इतके बिझी होतात की पत्नीजवळ प्रेम व्यक्त करायला त्यांना वेळ नसतो. अनेक प्रश्न तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमामुळे सुटू शकतात.

जाहिरात
0607

योग्य शब्द वापरा - कधीही रागाच्या भरात तुम्ही जोडीदाराशी बोलताना चुकीचा शब्द वापरलात तर भांडणं होऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराची नावडती गोष्टही प्रेमानं सांगा.

जाहिरात
0707

अति अपेक्षा नको - वास्तव आणि स्वप्न यात फरक असतो. स्वत:मध्ये अनेक दोष असूनही पती आपल्या पत्नीकडून अवाजवी अपेक्षा ठेवतो. त्यानं नातं बिघडतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या