नवी दिल्ली, 28 जुलै: दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बदल म्हणून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा एखाद्या पर्यटन स्थळी (Tourist Destination) जाणं सर्वांनाच आवडतं. काही लोकांना फिरण्याची खूप आवड असते, ते सतत लहान-मोठ्या सहलींना जात असतात. काही जणांना सगळ्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसह प्रवास करण्यात आनंद मिळतो. काहींना मात्र एकट्यानं फिरायला (Solo Travelling) आवडतं. त्यांना गर्दी, गोंगाट नको असतो. शांत ठिकाणी रमायला त्यांना आवडतं. असं लोक आवर्जून एकट्यानं प्रवास करतात. अशा सोलो ट्रॅव्हलर्सची (Solo Travelers) संख्या आता वाढत आहे. एकट्यानं फिरण्याची आवड असणं हे व्यक्तिमत्व आणि राशीवर देखील (Zodiac Sign) अवलंबून आहे. पाच राशींच्या लोकांमध्ये ही आवड प्रामुख्यानं दिसून येते. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. मेष (Aries) : या राशीच्या लोकांना सर्व प्रकारची जोखीम एकट्यानं घेण्यास आवडतं. हे लोक त्यांच्या तत्त्वांवर ठाम असतात. त्यांना काहीतरी नवीन किंवा साहसी (Adventure) गोष्टी करण्याची आवड असते. त्यामुळे अनेकदा त्यांचे प्रवास अविस्मरणीय ठरतात. त्यांना स्काय डायव्हिंग, रिव्हर राफ्टिंग अशी अॅडव्हेंचर्स करायला आवडतात. वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय गुंतागुंतीचा असतो. त्यांना प्रवासामध्ये व्यत्यय किंवा जबाबदाऱ्यांचं (Responsibility) ओझं वागवायला आवडत नाही. त्यामुळं समूहानं फिरणं त्यांना पसंत नसतं. स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी त्यांना एकट्यानं फिरणं अधिक आवडतं. शांत ठिकाणी जाण्याला त्याचं प्राधान्य असतं. कन्या (Virgo) : कन्या राशीचे लोक विनाकारण कोणताही प्रवास करत नाहीत. त्यांच्या प्रत्येक प्रवासामागं काहीतरी हेतू असतो. सहलीचं नियोजन करताना हे लोक त्यातून मिळणाऱ्या लाभांचा विचार करतात. त्यामुळं अनेकदा हे लोक एकट्यानं प्रवास करणंच पसंत करतात. नवनवीन गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. प्रवासातही ते नवनवीन बाबींचा वापर करतात.
कॅफिनचं Tension सोडा! रोज सकाळी घ्या कॉफी; डायबिटीस,ब्लडप्रेशर राहील नियंत्रणात
मीन (Pisces) : मीन राशीचे लोक स्वभावानं अतिशय सौम्य, मृदु असतात. त्यांची वाणी मधुर असते, तसंच ते कल्पक असतात. एकट्याने प्रवास करायला, निसर्गाच्या (Nature) सान्निध्यात रमायला त्यांना अधिक आवडतं. अनेक ठिकाणांना भेटी देण्याचं त्यांचं स्वप्न असतं. त्यांना समूहात, गर्दीत रहायला आवडत नाही. त्यामुळं त्यांना एकट्यानं प्रवास करणं आवडतं. धनु (Sagittarius) : या राशीचे लोक भटक्या स्वभावाचे असतात. त्यांना फिरायला जाताना कुणाच्याही सोबतिची गरज वाटत नाही. मेहनती आणि सर्जनशील असणाऱ्या या लोकांना स्वतःला वेळ देणं आवडतं. नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला त्यांना खूप आवडतं. प्रवासातही त्यांना नवीन लोकांना भेटायला, नवीन गोष्टी अनुभवायला आवडतं.