JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / भारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा, पाहा PHOTOS

भारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा, पाहा PHOTOS

भारताच्या उत्तराखंड राज्यात भारत आणि तिबेट दरम्यान 150 वर्षं जुन्या व्यापारी मार्गाचं (Uttarkashi Skywalk) नूतनीकरण केलं आहे. प्रतिकूल हवामान असूनही समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर हे पर्यटनस्थळ उभारण्यात आले आहे. कसं काम केलं इथे कामगारांनी PHOTO बघूनही येईल शहारा..

0105

उत्तरकाशीतील प्राचीन स्कायवॉकचं(Uttarkashi Skywalk) पर्यटनस्थळामध्ये रूपांतर करणं हे काही सोपं काम नव्हतं. प्रशासनाच्या धैर्य, जोखीम आणि दृढनिश्चयाने हे काम पूर्ण झालं आहे.

जाहिरात
0205

हा व्यापारी मार्ग 1962 मध्ये भारत-चीन युद्ध (India China war in 1962) होईपर्यंत सुरू होता आणि नंतर नेलोंग खोऱ्याबाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आलं. सरकारने 2017 मध्ये या प्राचीन स्कायवॉकचे नूतनीकरण करण्याची योजना आखली होती.

जाहिरात
0305

कठीण परिस्थितीत धैर्याने काम करणाऱ्या मजुरांच्या समूहाने अखेर हा प्रकल्प पूर्ण केला आहे. स्थानिक कंत्राटदार राजपाल बिश्त (Rajpal Bisht) यांच्या नेतृत्वाखाली हे काम करण्यात आले आहे.

जाहिरात
0405

हा परिसर गंगोत्री राष्ट्रीय उद्यानाच्या (Gangotri National Park) अंतर्गत येतो, जो संरक्षित क्षेत्र आहे त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातून आम्हाला एकही दगड उचलण्याची परवानगी नव्हती, म्हणून आम्ही डेहराडूनहून (uttarakhand) लाकडाची व्यवस्था केली. असं बिष्ट म्हणाले.

जाहिरात
0505

ते म्हणाले की कामगारांना काम करताना बेल्टने बांधण्यात आलं होतं. खडकांच्या भेगांच्या दरम्यान लाकडी दांडे मारून त्याआधारे त्यांनी काम केलं. अखेर बिश्ट अॅन्ड कंपनीसाठी जोखीम फलदायी ठरली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या