JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Shani Jayanti 2022 : शनि जयंतीला या वस्तूंचं दान करा; सुख-समृद्धी वाढेल, संकटं दूर होतील

Shani Jayanti 2022 : शनि जयंतीला या वस्तूंचं दान करा; सुख-समृद्धी वाढेल, संकटं दूर होतील

यंदा शनि जयंती (Shani Jayanti) सोमवार, 30 मे रोजी आहे. शनिदेवाचा जन्म ज्येष्ठ अमावस्येला झाला. यामुळे दरवर्षी शनि जयंती ज्येष्ठ अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी ज्येष्ठ अमावस्या तिथी 29 मे रोजी दुपारी 02:54 ते सोमवार, 30 मे रोजी दुपारी 04:59 पर्यंत आहे. सोमवार असल्याने हा दिवस सोमवती अमावस्या सुद्धा आहे. 30 वर्षांनंतर असा योगायोग घडला आहे की, शनि जयंती, सोमवती अमावस्या जेष्ठ अमावस्येला एकत्र आलेत. शनि जयंती निमित्त शनिदेवाची पूजा करून साडेसाटी, धैय्या किंवा शनिदोषाच्या दुखापासून आराम मिळू शकतो. या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने सुख-समृद्धी वाढते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून शनि जयंतीला दान करावयाच्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत.

0106

शनि जयंतीच्या दिवशी पूजेनंतर गरीब व्यक्तीला काळे तीळ दान करा. साडेसाती, धैय्या आणि शनिदोषाच्या त्रासापासून आराम मिळेल. शनि, राहू आणि केतूचे अशुभ प्रभावही दूर होतील.

जाहिरात
0206

शनि जयंतीनिमित्त गरीब व्यक्तीला काळे किंवा निळे कपडे आणि चप्पल दान करा. आजार आणि शारीरिक वेदना दूर होतील.

जाहिरात
0306

शनि जयंतीला दीड किलो काळ्या उडदाचं दान केल्याने आर्थिक संकट दूर होतं आणि सुख-समृद्धी वाढते.

जाहिरात
0406

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल दान करू शकता. (Photo: Pixabay)

जाहिरात
0506

शनीच्या महादशेमध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर, लोखंड, छत्री, स्टीलची भांडी इत्यादी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. शांती मिळेल. (Photo: Pixabay)

जाहिरात
0606

शनि जयंतीच्या दिवशी असहाय्य लोकांची सेवा करून, त्यांना मदत करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता. (Photo: Pixabay)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या