JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO

सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO

आता फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करण्याची गरज लागत नाही. वेगवेगळ्या पोजेस घेऊन सेल्फी काढली जाते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे : टेक्नाॅलाॅजी अत्याधुनिक झालीय. त्यामुळे प्रत्येक हातात स्मार्टफोन आहे. आता मोबाइलचा उपयोग फक्त फोन करणं, मेसेज करणं, गाणी ऐकणं यासाठी होत नसतो, तर अनेक जण हाय रेसोल्युशन कॅमेऱ्यावरून आपले फोटो स्वत:च काढतात. आता फोटो काढण्यासाठी दुसऱ्याला विनंती करण्याची गरज लागत नाही. वेगवेगळ्या पोजेस घेऊन सेल्फी काढली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का,की सेल्फी तुमच्याबद्दल बरंच काही सांगून जाते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं गुपित उलगडते. तरुणांना सरकारमध्ये काम करण्याची संधी, असा आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम कम्प्युटर इन ह्युमन बिहेवियर नावाच्या जनरलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टप्रमाणे तुमची सेल्फी घेण्याची स्टाइल तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, हे दाखवून देते. या सर्वेमध्ये 123 जणांचा समावेश होता.  हे लोक रोज सेल्फी घ्यायचे. या संशोधनात सेल्फी घेणाऱ्यांच्या पोज, स्टाइल, जागा अशा 13 गोष्टींचा अभ्यास केला. त्यात सेल्फी घेणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास केला गेला. डोकं दुखतंय? मग विड्याचं पान खा, अजूनही आहेत भरपूर फायदे ज्या व्यक्ती सेल्फी घेताना ओठांचा चंबू करतात, त्या मनानं अस्थिर असतात. या व्यक्ती स्वत:च्या मूडप्रमाणे काम करतात. अर्थात, काही जण नियमांना अपवाद असतात. पण या सर्वेमध्ये जे लोक होते त्यांचा स्वभाव असा होता. काही जण असेही असतात, जे सेल्फी घेताना आपली जीभ बाहेर काढतात. संशोधनानुसार या व्यक्ती धमाल, मजा करणाऱ्या असतात. या व्यक्ती हॅपी गो लकी असतात. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या असतात. आयुष्य भरभरून जगतात. मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचं गुगल अकाउंट, जाणून घ्या कसं ज्या व्यक्ती जवळजवळ रोज आपलाच सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करतात, त्या स्वयंकेंद्रित असतात. असंही आढळून आलंय. अर्थात, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्यामुळे ही निरीक्षणं सगळ्यांना लागू होतीलच असं नाही. VIDEO: मोदींच्या मंत्रिमंडळात रामदास आठवलेंची वर्णी लागणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या