JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Medu Vada Recipe : अस्सल दाक्षिणात्य पद्धत्तीचा मेदू वडा कसा कराल?

Medu Vada Recipe : अस्सल दाक्षिणात्य पद्धत्तीचा मेदू वडा कसा कराल?

दाक्षिणात्य पदार्थ आपल्याकडे मोठ्या चवीने खाल्ले जातात. त्यामध्ये इडली, मेदू वडा, उत्तापा असे अनेक पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण, दाक्षिणात्य पदार्थ बनविण्याची मूळ पद्धती सर्रास वापरली जात नाही, तर मेदू वडा करताना नेमकी कोणती पद्धत वापरली पाहिजे आणि मेदू वड्याची रेसिपी कशी करायला हवी, ते जाणून घेऊ.

0105

साहित्य : 1 कप उडदाची डाळ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा कुटून घेतलेले काळे मिरे, 5-6 कढीपत्ता,  अर्धा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.

जाहिरात
0205

कृती : एक पातेलं घ्या, त्यात उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर दीड कप पाण्यात उडदाची डाळ 3 तास दीड भिजत ठेवा. पण, हे लक्षात घ्या की, 3 तासांपेक्षा जास्त वेळ डाळ भिजवू नका. डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

जाहिरात
0305

ही डाळ मिक्सरमध्ये वाटत असताना डाळीचं पीठ जास्त पातळ होणार नाही, याची काळजी घ्या. डाळीचे पीठ एका भांड्यात काढून 2 मिनिटं चांगलं हलवून घ्या. याच्यामुळे वडा हलका होण्यास मदत होते. त्यानंतर या पीठामध्ये चिरलेला कांदा, 1 चमचा जिरे, काळे मिरे, कढीपत्ता, चिरलेली हिरवी मिरची, चिमुटभूर हिंग, कापलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. आणि पुन्हा एकत्रित मिक्स करून घ्या.

जाहिरात
0405

यानंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करा. हाताने मिश्रण गोल आकाराचे करून त्याच्या मधोमध अंगठ्यानेच एक छित्र पाडून हळूच तेलात सोडा. एकावेळी 4 किंवा 5 वडे सोडा, जेणेकरून कढईत गर्दी होणार नाही आणि चांगले भाजले जातील.

जाहिरात
0505

तेलातील वडे उलटे-सुलेट करून भाजा. तांबूस सोनेरी रंग प्राप्त होत नाही, तोपर्यंत वडे चांगले भाजा. कारण, वडे सोनरी रंग प्राप्त झाले की, ते कुरकुरीत होतात. तळलेले वडे एका नॅपकिनवर ठेवा. एकदा त्यातील तेल पूर्ण नितळले की, ते आणखी कुरकुरीत होतात. तर अशाप्रकारे तुमचे मेदू वडे तयार झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या