मुंबई, 05 सप्टेंबर : उत्तम आरोग्यासाठी (Good health) वैयक्तिक स्वच्छतेची म्हणजेच पर्सनल हायजीनची (Personal Hygiene) काळजी घेणं आवश्यक असतं. वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यास संसर्गजन्य (Viral) तसंच अन्य आजारांचा धोका वाढतो. महिलांमध्ये जशी वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची असते, तशीच स्वच्छता पुरूषांनीही ठेवणं गरजेचं असतं. अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यानं अनेक गंभीर आजार किंवा त्वचा विकारांचा सामना करावा लागतो. 2010 मधील एका अमेरिकी अहवालातून स्पष्ट झालं आहे. पुरूषांनी आपल्या शरीराच्या 4 महत्त्वाच्या भागाची स्व स्वच्छता दैनंदिन करणं गरजेचं आहे. पुरूषांनी दाढी, केस, नखं तसंच जननेंद्रियाजवळील भागाची दररोज स्वच्छता करणं आवश्यक आहे. तसंच अंतर्वस्त्रं, मोजे यांचा वापर करण्यापूर्वी ते स्वच्छ धुतले आहेत की नाहीत याची खात्री करणं गरजेचं आहे. शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा एखाद्या जनावराला हात लावल्यानंतर बऱ्याचदा पुरूष आपले हात धुवून स्वच्छ करतातच असं नाही. त्यामुळं असं दुर्लक्ष आरोग्यावर विपरीत परिणाम करणारं ठरू शकतं. हे वाचा - आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; ‘या’ वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर… सध्याच्या काळात अनेक पुरूषांना केस गळतीच्या (Hair fall) समस्येचा सामना करावा लागत आहे. प्रदूषण, धूलीकण, स्वच्छतेच्या अभावामुळं केस सैल होणं किंवा संसर्ग झाल्याचं दिसून येत आहे. यामुळे केस गळतीची समस्या वाढत आहे. त्यामुळे पुरूषांनी नियमित माईल्ड शाम्पूनं (Mild Shampoo) केस धुणं गरजेचं आहे. याशिवाय वैयक्तिक स्वच्छतेचा भाग म्हणून पुरूषांनी बाहेरून व्यायाम करून आल्यानंतर स्नान (Bath) करणं गरजेचं आहे. यामुळे शरीरावरील हानीकारक जीवाणू, घाण आदी निघून जाते. तसेच यामुळं त्वचा आणि आरोग्य चांगलं राहतं. पुरुषांसाठी सेक्शुअल हायजीनही (Sexual Hygiene) महत्त्वाचं आहे. प्युबिक हेअरची स्वच्छता ठेवणं, तसेच इंटरकोर्सनंतर युरिन करणं आणि जननेंद्रिय स्वच्छ करणं आवश्यक आहे. हे वाचा - प्रॉस्टेट कॅन्सरपासून वाचवतो सेक्स; वीर्यस्खलनामुळे कमी होतो आजाराचा धोका पुरूषांनी वेळोवेळी नखांची स्वच्छता ठेवणं आणि ती कापणं गरजेचं आहे. नखांमध्ये घाण साठून राहते. जेवताना ही घाण पोटात गेली तर संसर्ग, पोटदुखी किंवा उलटीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजकाल पुरूषांमध्ये लांब दाढी, मिशा ठेवण्याची फॅशन आहे. परंतु, असं करताना स्वच्छतेकडं लक्ष देणंही गरजेचं आहे. कारण दाढीत धुलीकण, घाण जाऊन बसते. यामुळे त्वचेवर व्रण उठणं, खाज सुटणं असे आजार होऊ शकतात. हे वाचा - Heart Attack मुळे दररोज मरताहेत चारातले 3 लोक; धक्कादायक आकडेवारी आली समोर! बॅचलर तरूण आपली अंतर्वस्त्रं (Undergarments) आणि मोज्यांच्या स्वच्छतेकडं दुर्लक्ष करत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. ही बाब आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. यामुळे जननेंद्रियाजवळ संसर्ग होणं, व्रण उठणं, पायांना संसर्ग किंवा चिखल्या होणं आदी समस्या उदभवू शकतात. त्यामुळे महिला जशा वैयक्तिक स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतात तशीच काळजी पुरुषांनीही घ्यायला हवी. त्यामुळे त्यांचं आरोग्य उत्तम राहील.