JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / डस्की स्किन टोनसाठी सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे सुंदर डिझायनर लेहेंगे, एकदा नक्की ट्राय करा...

डस्की स्किन टोनसाठी सध्या ट्रेंडमध्ये आहेत हे सुंदर डिझायनर लेहेंगे, एकदा नक्की ट्राय करा...

सौंदर्य त्वचेच्या टोनवर अवलंबून नसते. तर तुमचा अपिअरन्स, स्टाईल आणि तुमचे व्यक्तिमत्व तुमचे अंतर्बाह्य सौंदर्य अधोरेखित करते. जर तुम्ही तुमच्या दिसण्याची विशेष काळजी घेतली. तर तुम्ही प्रत्येक फंक्शनमध्ये सुंदर दिसू शकता. आज आपण सावळ्या त्वचेच्या मुलींसाठी कोणत्या प्रकारचे लेहेंगा ट्रेंडमध्ये आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Fashion designers Manish Malhotra), सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) आणि अनिता डोगरे (Anita Dogre) यांनी डिझाइन केलेले हे खास लेहेंगा बॉलीवूडच्या लग्न समारंभात अनेक अभिनेत्रींनी सुंदरपणे कॅरी केलेले आहेत. हे डिझायनर लेहेंगे (Designer Lehenga) दिसायला अतिशय सुंदर आहेत आणि ते सावळ्या रंगाच्या म्हणजेच डस्की स्किन टोन असलेल्या मुलींसाठी (Perfect Lehenga For Girls With Dusky Skin Tone) परफेक्ट म्हणता येतील.

0105

अनिता डोगराचा हा डिझायनर लेहेंगा डस्की स्किनसाठी योग्य आहे. पांढऱ्या बेसवर गुलाबी आणि राखाडी रंगाचे सुंदर काम करण्यात आले आहे. या लेहेंग्यासोबत जर तुम्ही मोत्यांचा हार आणि कानातले घातले तर सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील. image : Instagram/anitadongre

जाहिरात
0205

पीच ग्रीन बेस आणि सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हा लेहेंगा तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी काम करेल. तुम्ही हा लेहेंगा दिवसाच्या कार्यक्रमांसाठीही घालू शकता. image : Instagram/anitadongre

जाहिरात
0305

लाल रंग डस्की स्किन टोन मुलींवरही खूप सुंदर दिसते. जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणार असाल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे लाल रंगाचा लेहेंगा खरेदी करू शकता. image : Instagram/ sabyasachiofficial

जाहिरात
0405

आजकाल लेहेंग्यात मेटॅलिक कलर खूप ट्रेंडमध्ये आहे. डस्की स्किन टोनवर हा रंग खूप सुंदर दिसतो. डस्की स्किन टोन असलेल्या मुली मनीष मल्होत्राच्या या डिझायनर लेहेंगापासून प्रेरणा घेऊ शकतात. या लेहेंग्यात निळे आणि धातूचे रंग सुंदरपणे पसरवले गेले आहेत. image : Instagram/manishmalhotraworld

जाहिरात
0505

जर तुम्ही रात्रीच्या फंक्शनसाठी लेहेंगा शोधत असाल. तर तुम्ही या प्रकारच्या इंडो वेस्टर्न स्टाईल लेहेंग्यापासून प्रेरणा घेऊ शकता. हा लेहंगादेखील मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेला आहे. image : Instagram/manishmalhotraworld

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या