JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / Post Covid-19: कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवू शकतात 'या' 5 समस्या

Post Covid-19: कोरोनातून बरे झाल्यानंतरही जाणवू शकतात 'या' 5 समस्या

लांसेटच्या (Lancet Study) अभ्यासानुसार, कोरोना संक्रमित रूग्णाची टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरही रूग्णामध्ये पुढील अनेक दिवस काही लक्षणं (Covid-19 Symptoms) दिसतात. ही 5 लक्षणं अतिशय गंभीर आहेत.

0107

एकूण 10.3 कोटी कोरोना संक्रमित रूग्ण आणि 22.4 लाख मृत्यूनंतरही कोरोनासोबतची लढाई अजूनही सुरू आहे. काही ठिकाणी लसीकरण करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तर काही ठिकाणी अजूनही कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि सक्तीचे नियम केले जात आहेत. दरम्यान, लांसेटनं यावर संसोधन करत कोरोना रूग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्यावर काय दीर्घकालीन परिणाम होतो याबाबत अभ्यास केला आहे.

जाहिरात
0207

कोरोनानंतर सामान्य स्थितीत येण्यासाठी शरीर भरपूर वेळ घेऊ शकतं. मेंदूपासून ते हृदयापर्यंत अशा काही तक्रारी आहेत, ज्या कोरोनातून बरं झाल्यानंतरही रिकव्हर होण्यास खूप वेळ घेत आहेत. काही घटनांमध्ये तर अत्यंत गंभीर स्थितीदेखील पाहायला मिळाली आहे. याबाबत लांसेटच्या अभ्यासातून असं समोर आलं की 5 अशा तक्रारी आहेत ज्या लाँग कोविडच्या लक्षणांमध्ये आढळून येतात आणि अनेक रूग्ण या लक्षणांचा दीर्घकाळ सामना करतात.

जाहिरात
0307

थकवा - एक वर्षाहून अधिक काळ सुरू असणारा हा कोरोना काळ लोकांसाठी थकवणारा ठरला आहे. कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये थकवा जास्त दिसून येतो. जवळपास 63 टक्के रूग्णांनी सांगितलं, की त्यांना जवळपास सहा महिने थकवा, अशक्तपणा आणि अंगदुखीचा सामना करावा लागला. हे लाँग कोविडचं प्रमुख लक्षणं असून यामुळे रूग्णाला पूर्वपदावर येण्यासाठी खूप वेळ लागतो.

जाहिरात
0407

स्नायूंमध्ये कमकुवतपणा - कोरोनातून बरं झाल्यानंतर सर्वाधिक काळ दिसणाऱ्या लक्षणांमध्ये हाडांमध्ये वेदना किंवा स्नायूंमध्ये कमकुवतपणा हे लक्षण सामान्य आहे. कोरोनामध्ये जास्त त्रास न झालेल्या आणि निरोगी लोकांनाही याचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय पाठ आणि पायदुखीची समस्याही उद्भवते.

जाहिरात
0507

झोपेची समस्या : कोरोनातून पूर्णपणे बरं होणं सोपी गोष्ट नाही. अशात थकवा आणि कमजोरी असल्यामुळे आराम करणं आवश्यक असतं. मात्र, यावेळी झोप पूर्ण न होणं तसंच व्यवस्थित झोप न लागणं अशा समस्या उद्भवतात. लांसेटच्या अभ्यासानुसार, हे रुग्ण झोपेच्या समस्येचाही दिर्घकाळ सामना करतात. झोप पूर्ण न झाल्यास इतर समस्यांनाही सामोरे जावं लागतं.

जाहिरात
0607

डिप्रेशन आणि मेंटल हेल्थ - जुलै 2020 ला इटलीमध्ये एका संशोधनातून असं समोर आलं, की कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रूग्णांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मानसिक समस्येचा धोका अधिक आहे. डिप्रेशनसोबतच स्मरण शक्तीवर परिणाम, मूड वारंवार बदलणे अशा समस्याही अनेक काळ राहातात. अनेक लोकांना कोरोनातून बरं झाल्यानंतर या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

जाहिरात
0707

काळजी आणि भीती -लांसेटच्या अभ्यासानुसार, 15 टक्के रूग्णांनी काळजी आणि डिप्रेशनची तक्रार सांगितली. कोरोनातून बरं झाल्यानंतर रूग्णांना पुन्हा संक्रमण होण्याचा धोका, शारिरिक समस्या, मेंटल हेल्थ याबद्दल काळजी वाटू लागते आणि त्यांच्या मनामध्ये एकप्रकारची भीती निर्माण होते. काही केससमध्ये लोकांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनातून बरं झाल्यानंतर रूग्णांनी पूर्णपणे आराम आणि आपल्या शरिराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या