Heart Attack : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. सिद्धार्थ शुक्ला, अमित मिस्त्री यांसारख्या लोकप्रिय अभिनेत्यांनंतर गायक के.के यांच्या निधनाने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध लोकांच्या मृत्यूनंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काय होते, इत्यादी अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये फक्त हृदयाला दुखापत होत नाही (Heart Attack) तर बरेच काही होते.
हृदयविकाराच्या वेळी हृदयात काय होते? क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, जेव्हा एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा हृदयाच्या एका भागात रक्त प्रवाह थांबतो किंवा सामान्यपेक्षा कमी होतो.
त्यामुळे हृदयाचा तो भाग खराब होऊ लागतो. डॅमेज झाल्यामुळे, हृदयाचा खराब झालेला भाग स्वतःहून रक्त पंप करू शकत नाही, त्यामुळे संपूर्ण हृदयाच्या पंपिंग क्रमात व्यत्यय येतो.