JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला आणि कारणं

कोरोनाची लस घेतल्यावर किती दिवस करू नये सेक्स? वाचा शास्त्रज्ञांचा सल्ला आणि कारणं

सेक्स करताना शरीरात तणाव वाढतो जो लस (Vaccine) घेतल्यानंतर शरीरात होत असलेल्या बदलांच्या काळात योग्य नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

जाहिरात

यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 12 जुलै: सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) मगरमिठीतून सुटका मिळवण्यासाठी लसीकरण (Vaccination) करण्यावर भर देण्यात येत आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत यांनी विकसित केलेल्या लसी दिल्या जात आहेत. नवनवीन लसींचे संशोधनही सुरू आहे. जितक्या जास्त लशी येतील तितकं जास्त वेगानं लसीकरण होऊ शकणार आहे. तसंच कोरोनाचा विषाणूही सतत आपली रूपं बदलत असल्यानं त्यावर प्रभावी ठरतील अशा लसींची आवश्यकताही आहेच. सध्यातरी लसीकरण हाच या विषाणूवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, मात्र या लसीबाबतही अनेक समज, गैरसमज पसरत असतात. लस घेतल्यावर अनेकांना ताप येणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे असे अनेक त्रास होत असल्याचं आढळलं आहे. अशावेळी लस घेताना डॉक्टर, संशोधक यांनी सांगितलेल्या सल्ल्याचं पालन करणं महत्त्वाचं असतं. रशियात (Russia) सध्या संशोधकांमध्ये अशाच एका सल्ल्यावरून वादविवाद रंगला आहे. महिलेला कोव्हॅक्सिनऐवजी दिला कोविशल्डचा डोस, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार रशियातील सेराटोव (Seratov) प्रांतांचे उपआरोग्यमंत्री डॉ. डेनिस ग्रेफर यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्स (No Sex for Three Days After Vaccination) करू नये असा सल्ला दिला आहे. सेक्स करताना शरीरात तणाव वाढतो जो लस घेतल्यानंतर शरीरात होत असलेल्या बदलांच्या काळात योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा सल्ला दिला. सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक ऊर्जा वापरली जाते. त्यामुळं लस घेतल्यानंतर अधिक ऊर्जा लागणाऱ्या सेक्ससारख्या कोणत्याही क्रिया करू नयेत, असा सल्ला आम्ही नागरिकांना देतो, असं त्यांनी यावेळी सांगितलं. लाईव्ह हिंदुस्थान डॉटकॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. त्यांच्या या सल्ल्यावर डॉ. ग्रेफर यांचे वरिष्ठ ओलेग कोस्टीन यांनीच टीका केली आहे. लस घेतल्यानंतर सेक्स करण्यास हरकत नाही, मात्र थोडी काळजी घ्या. अतिरेक करू नका, लोकांना एवढी समज नक्की असेल, असं ओलेग कोस्टीन यांनी म्हटलं आहे. पालकांनो जपा आपल्या लहानग्यांना!कोरोनामुळे होतोय मुलांच्या मेंदूवर परिणाम;ऐका तज दरम्यान, ‘स्पुटनिक व्ही’(Sputnik V) ही लस विकसित करणाऱ्या रशियातच लसीकरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचं दिसत आहे. युरोपियन देशात 30 टक्के लसीकरण झालं आहे, तर रशियात आतापर्यंत केवळ 13 टक्के लोकांनाच लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यावरून रशियावर टीकाही होत आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारतासह 67 देशांमध्ये तिला परवानगी देण्यात आली आहे. ही लस अत्यंत प्रभावी असल्याचंही दिसून आलं आहे, मात्र अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) तिला परवानगी दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या