JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / रक्षाबंधन असो किंवा पार्टी! 'Fashion Goals' देणारे निया शर्माचे बोल्ड लुक्स

रक्षाबंधन असो किंवा पार्टी! 'Fashion Goals' देणारे निया शर्माचे बोल्ड लुक्स

अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे तुम्ही रक्षाबंधन किंवा कोणत्याही पार्टीमध्ये अत्यंत सहज कॅरी करू शकता.

0108

नागिन 4 मध्ये 'नागिन'ची भूमिका निभावणारी निया शर्मा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0208

इन्स्टाग्रामवर ती तिच्या चाहत्यांना शूटिंगबाबत नेहमी अपडेट देत असते. त्याचप्रमाणे तिचे लुक्स देखील व्हायरल होत असतात. टेलिव्हिजनची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून नियाकडे पाहिलं जातं (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0308

फॅशन आणि स्टायलिंगची असणारी आवड तिच्या प्रत्येक फोटोतून झळकत असते. पारंपरिक साडी ते पार्टी लुकमध्ये निया नेहमीच सुंदर दिसते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0408

तिचे काही लुक्स असे आहेत जे तुम्ही रक्षाबंधनासाठी किंवा कोणत्याही पार्टीसाठी अंमलात आणू शकता. त्याने तुमच्या स्टाइलचे देखील कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0508

निया शर्माने या लुकमध्ये पांढऱ्या रंगाची शीअर सा़डी नेसली आहे. त्यावल हलकेसे सोनेरी काम केलेले आहे. यावर तिने सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि झुमके देखील घातले आहेत. यावर तिने हलकासा मेकअप केला आहे, लाल रंगाची लिपस्टिक या साडीवर खुलून दिसेल. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0608

आइस ब्लू लेहंगा- नियाच्या या फोटोमध्ये तिने आइस ब्लू रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यावर मजंटा आणि सोनेरी रंगांचे कशिदाकाम केले आहे. त्यावर तिने आइस ब्लू आणि पिवळ्या रंगाची ओढणी घेतली आहे. यावर तिने न्यूड मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0708

अॅक्वा ब्लू ड्रेस- निया शर्माचा हा ड्रेस 'Summer Wibes' देणारा आहे. यावर तिने सिल्ह्वर चेन बेल्ट कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
0808

निया शर्माचा व्हेकेशन लुक - या फोटोमध्ये निया एकदम व्हेकेशन मोडमध्ये गेल्यासारखी दिसत आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा फ्रिंज स्कर्ट कॅरी केला आहे. तिने या स्कर्टवर घातलेले गॉगल तिचा लुक एकदम पूर्ण करत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @niasharma90)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या