भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वांत आवडता पदार्थ कोणता, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा वीकपॉइंट कुठला, पाहा PHOTOS
आपल्या देशी स्टाइलसाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजराती जेवणच सर्वात जास्त आवडतं. ते सहसा त्यांच्या खानसाम्याला खिचडी करायला सांगतात. त्यांना हिरव्या भाज्या देखील आवडतात.
नॉर्थ कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन काही वर्षांपूर्वी आपल्या वाढत्या वजनामुळे खूप अस्वस्थ होते. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे; परंतु, पनीर आणि वाइन अशा दोन गोष्टी आहेत ज्या पाहून किम जोंगच्या मनावरचा ताबा सुटतो.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेतात. परंतु, जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या डिशबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी पिस्ताचिओ आईस्क्रीम (पिस्ता आइस्क्रीम) असं उत्तर दिलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनासुद्धा आईस्क्रीम खूप आवडतं. आईस्क्रीम दिसताच ते एखाद्या लहान मुलासारखे आनंदी होतात.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नॉन-व्हेजमध्ये रोस्टेड चिकन खूप आवडतं. यासह त्यांना बिर्याणीही खूप आवडते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना बन्स, सूप आणि भाज्या आवडतात. ते सहसा नॉन व्हेजच खातात. त्यांना पोर्क खायलाही खूप आवडतं. यासह, चिरलेले कांदे आणि अर्धवट शिजवलेले बीन्स आणि इतर भाज्याही ते आवडीने खातात.