JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान

देशातील या शहरातील लोक देतात सर्वाधिक कर, जाणून घ्या मुंबईचं स्थान

आपल्या देशाची लोकसंख्या ही 130 कोटींहूनही जास्त आहे. पण 2019-20 मध्ये फक्त 5.65 कोटी लोकांनीच कर भरला.

0106

आपल्या देशाची लोकसंख्या ही 130 कोटींहूनही जास्त आहे. पण 2019-20 मध्ये फक्त 5.65 कोटी लोकांनीच कर भरला. अनेक लोकांनी त्यांचं इनकम टॅक्स शून्य दाखवला. शहरांबद्दल बोलायचे झाले तर कर गोळा करण्यात सर्वात पुढे मुंबई शहर आहे. याशिवायही इतर शहरांबद्दल जाणून घेऊ.

जाहिरात
0206

देशात सर्वाधिक कर देणाऱ्या शहरांमध्ये आर्थिक नगरी मुंबई अग्रणी आहे. 2019 या चालू वर्षात मुंबईमधून एकूण 3.52 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करण्यात आला. हा कर गेल्या वर्षाच्या तुलनेत 52 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

जाहिरात
0306

दुसऱ्या स्थानावर दिल्ली शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये दिल्लीकरांनी 1.60 लाख कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 31 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

जाहिरात
0406

तिसऱ्या स्थानावर बंगळुरू हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 1.19 लाख कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

जाहिरात
0506

चौथ्या स्थानावर चैन्नई हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 74 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 8 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

जाहिरात
0606

पाचव्या स्थानावर हैदराबाद हे शहर आहे. वित्तीय वर्ष 2019 मध्ये या शहरातून 57.3 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9.3 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या