JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दूध पिताना एक छोटीशी चूक पडेल महागात; तुम्हालाही अशी सवय तर नाही ना?

दूध पिताना एक छोटीशी चूक पडेल महागात; तुम्हालाही अशी सवय तर नाही ना?

आयुर्वेदात आहाराविषयीचे काही नियम सांगितले असून त्या नियमांचं पालन केलं तर निश्चित उत्तम आरोग्य लाभू शकतं.

जाहिरात

दूध तुमच्या निरोगी आरोग्यासाठीही दूध खूप महत्त्वाचे आहे. त्यात कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे ए, डी, के, ई, चरबी आणि ऊर्जा यासह अनेक पोषक घटक असतात. यातील प्रथिने आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप मदत करतात. म्हणूनच तुमचे आरोग्य चांगले राखण्यात दूध विशेष भूमिका बजावते. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. तसेच दंत आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट : उत्तम आरोग्य (Good Health) लाभावं यासाठी संतुलित आहार आणि योग्य व्यायाम गरजेचा असतो. आपला दैनंदिन आहार (Daily Diet) कसा असावा, याविषयी तज्ज्ञ, डॉक्टर्स, हेल्थ एक्सपर्ट्स मार्गदर्शन करत असतात. वजन, उंची आणि काही आजार असल्यास त्यानुसार आपला दैनंदिन आहार असावा असा एक नियम आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य आहारविहार ठेवल्यास आपल्याला उत्तम आरोग्याचा आनंद मिळू शकतो. पण आपल्या भारतीय परंपरेत एक असं पुरातन वैद्यक शास्त्र आहे की ज्या शास्त्रात माणसाचा आहार कसा असावा, हे सांगितलं आहे. हे शास्त्र म्हणजे आयुर्वेद (Ayurveda). आज आहाराविषयी बरंच मार्गदर्शन मिळतं पण ते आयुर्वेदानुसार असतंच असं नाही. आयुर्वेदात आहाराविषयीचे काही नियम सांगितले असून, त्या नियमांचं पालन केलं तर निश्चित उत्तम आरोग्य लाभू शकतं (Dangerous food combinations). दुधात (Milk) फळं (Fruit) घालून मिल्कशेक करून पिण्याची सवय अनेकांना असते. त्यासोबत दुधात कस्टर्ड पावडरही घातली जाते. परंतु, दुधासोबत फळं खाणं चुकीचं आहे. कारण दुधात फळं घालून खाल्ल्यास दुधातलं कॅल्शियम (Calcium) फळातलं एन्झाइम शोषून घेतात. त्यामुळे फळं खाऊनही त्याचा शरीराला फारसा फायदा होत नाही. तुम्ही उडदाच्या डाळीचा पदार्थ खाल्ला असेल, तर त्यावर लगेच दूध पिऊ नये. तसंच मुळा, अंडी (Eggs), मांस (Meat) खाल्ल्यानंतरही लगेच दूध पिऊ नये. कारण त्यावर लगेच दूध प्यायलं, तर पचनास अडथळा निर्माण होतो आणि हे पदार्थ नीट पचत नाहीत. हे वाचा -  अंड किंवा मासे नाही तर, शाकाहारी पदार्थांनी करा प्रोटीनची कमतरता दूर भेंडी (Ladies Finger) आणि कारलं या दोन्ही भाज्या आवडणारे अनेक लोक आहेत. परंतु, या दोन्ही भाज्या एकत्र खाणं योग्य नाही. कारण भेंडी आणि कारलं एकत्र खाल्ल्याने पोटात विषनिर्मिती (Poison) होऊ शकते. हे तुमच्या जीवावरही बेतू शकतं. अनेक लोक सॅलड म्हणून मुळा खातात; पण त्याच वेळी तुम्ही भेंडीचे पदार्थ सेवन करणार असाल तर त्यासोबत मुळा खाऊ नये. मुळा आणि भेंडी यांच्या कॉम्बिनेशनमुळे त्वचेत मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतात. यामुळे त्वचेवर डाग येणं, तसंच अन्य त्वचाविकार उद्भवू शकतात. हे वाचा -  ‘या’ व्यक्तींनी चमचाभर दहीसुद्धा खाऊ नये; वाढतील आरोग्याच्या समस्या दह्यासोबत कांदा (Onion) असं मिश्रण करून खाणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे असं खाणं वर्ज्य करावं. अन्यथा डाग, खाज, एग्जिमा, सोरायसिस यांसारखे त्वचा विकार आणि पोटाचे आजार होण्याचा धोका असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या