सोमवारी ओडिशाच्या पुरी इथल्या भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी Coronavirus च्या भयामुळे भाविकांशिवाय रथ यात्रा काढली जात आहे.
ओडिशाच्या पुरी येथे भगवान जगन्नाथांची रथ यात्रा सुरू झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी भाविकांच्या गर्दीअभावी जगन्नाथ रश यात्रा सुरू झाली.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदाही भाविकांना या यात्रेत सहभागी होता येणार नाही. पुरीमध्ये 2 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली आहे. पुरी जिल्हा प्रशासनाने सर्व भक्तांना हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. (Pic- ANI)
ज्यांचा आरटी पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असेल आणि ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच हा रथ ओढण्याची संधी मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत जगन्नाथ यात्रा सुरू झाली. (Pic- ANI)
गुजरातमधील भगवान जगन्नाथ मंदिरातही रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रथ यात्रे दरम्यान मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते.
अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथांच्या रथ यात्रेच्या अगोदर गृहमंत्री अमित शहा यांनी मंदिरात भेट दिली आणि देवाची आरती केली
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही जगन्नाथ रथ यात्रेला गेले आणि त्यांनीही देवाची उपासना केली. (Pic- ANI)