कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?
नवी दिल्ली, 19 मे : सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स त्यानंतर वयोवृद्ध नागरिक आणि इतर आजार असलेल्यांना नागरिकांना कोरोना लस (Corona vaccination) दिली जात होती. पण आता 18+ नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कुणी कोरोना लस घ्यावी आणि कुणी नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान आता कोरोना लसीकरण नियमात केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. कोरोना लसीकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या NEGVAC (National Expert Group on Vaccine Administration) या समितीने केंद्राकडे नव्या मार्गदर्शक सूचना सोपवल्या. या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केल्या आहेत. नव्या नियमानुसार आता कोरोना झालेल्या रुग्णांना कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लस घेता येईल. जर कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कुमाला कोरोना झाला तर त्या व्यक्तीला कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेता येईल. हे वाचा - ‘कुणीच जिवंत राहणार नाही’, खळबळजनक ट्वीट करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने घेतला जीव याशिवाय कोरोना लसीकरणातील सर्वात मोठा बदल म्हणजे स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोना लस घेता येणार आहे. आतापर्यंत प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोना लस दिली जात नव्हती. त्याबाबत फारसे स्पष्ट नियम नव्हते. पण आता NEGVAC ने ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलाही कोरोना लस घेऊ शकतता, असं सांगितलं आहे. हे वाचा - 300 पेक्षा जास्त Covid मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अखेर त्यालाच कोरोनानं गाठलं आणि याआधी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हवर वोक्हार्ट रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांसाठी कोरोना लस कशी फायदेशीर ठरू शकते, हे सांगितलं होतं. बाळाला दूध पाजत असाल तर कोरोना लस घेऊ शकता. उलट तुमच्या रक्तातील अँटिबॉडीज ब्रेस्ट मिल्कमार्फत थोड्या फार प्रमाणात बाळापर्यंतही जाऊ शकतात. त्यामुळे त्यालाही सुरक्षा मिळेल, असं त्या म्हणाल्या होत्या.