इतिहासात काही असे मृत्यूचे किस्से नोंदले गेले आहेत की ऐकून विश्वास बसणार नाही. जगभरातल्या अशा 7 विचित्र कारणांमुळे झालेल्या मृत्यूंविषयी जाणून घ्यायचंय?
एस्किलस (Aeschylus) एक ग्रीक लेखक होता, ज्याला ट्रॅजेडीचा जनक म्हटलं जातं. त्याचा डोक्यावर कासव पडल्याने मृत्यू झाला. आकाशात उडणाऱ्या घारीला एस्किलसचं डोकं म्हणजे दगड वाटला म्हणून तिने वरून चोचीत पकडलेलं कासव खाली टाकलं, असं म्हणतात.
एम्पेडक्लेस (Empedocles) एक तत्वज्ञ होते. त्यांचं शरीर गायब होऊन ते अमर देवता होतील असा विचार करून त्यांनी स्वतःला ज्वालामुखीच्या स्वाधीन केले होते आणि त्यांचा मृत्यू झाला
ड्रॅको हे अथेन्सचे पहिले आमदार होते. असे म्हणतात की थिएटरमध्ये जेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर टोप्या आणि कपडे फेकण्यास सुरुवात केली तेव्हा इतके कपडे गोळा झाले की ड्रॅकोचा त्याच कपड्यांच्या ढीगमध्ये गुदमरून मृत्यू झाला.
झ्यूक्सिस हा एक प्राचीन ग्रीक चित्रकार होता. त्याची चित्रकला अशी होती की मूळ वस्तू आणि चित्रात फरक करणं कठीण होते. असं म्हणतात की जेव्हा त्याला कोणीतरी ग्रीक देवी ऍफ्रोडाईटचं चित्र काढण्यास सांगितले होते तेव्हा त्यानं ते चित्र काढले परंतु ते चित्र खूप विचित्र दिसत होते. हे चित्र पाहून झ्यूक्सिसचं हसू थांबतच नव्हतं. शेवटी हसता हसताच त्याचा मृत्यू झाला.
हेराक्लिटस एक तत्वज्ञ होता. त्याच्या पायावर सूज येत असे. या समस्येवर उपचार करण्यासाठी त्याने स्वतःला शेणापासून बनलेल्या खाद्यात पुरले. त्या खाद्याच्या उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाला.
मार्कस लिकीनिअस क्रॅसस हा एक रोमन जनरल व राजकारणी होता, तो मानवी इतिहासातील सर्वात श्रीमंत पुरुष होता. असं म्हणतात की एका युद्धानंतर त्याच्या शत्रूंनी त्याला वितळलेलं सोनं पिण्यास भाग पाडलं होते. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
मिथ्रीडेटस हा पर्शियन राजाच्या सैन्यात एक सैनिक होता. दूध आणि मधात बुडवून त्याची हत्या करण्यात आली होती.'