मुंबई, 15 मे- सध्या सोनी टीव्हीवर इंडियन आयडॉल(Indian Idol) हा शो सुरु आहे. ‘इंडियन आयडॉल12’ या सीजनने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. यातील प्रत्येक स्पर्धक एकापेक्षा एक आहे. तसंच या स्पर्धकांमध्ये खूप घट्ट मैत्री सुद्धा दिसून येते. नुकताच एक मैत्रीचा अजब किस्सा समोर आला आहे. या शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या आशिष कुलकर्णीने( Aashish Kulkarni) मोहम्मद दानिशसाठी (Mohammad Danish) रोजा धरला होता. त्यामुळे यांच्या मैत्रीची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
मुस्लिम बांधवांमध्ये अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानमध्ये महिनाभर कडक रोजा करण्यात येतो. काहीही न खाता-पिता हा रोजा धरला जातो. इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक असणारा दानिश हा एका मुस्लीम कुटुंबातील आहेत. त्यामुळे तो सेटवर सुद्धा रोजा धरत होता. यातच आशिष कुलकर्णीने खास दानिशसाठी चक्क एक रोजा केला होता. याबद्दल त्याने स्वतः सांगितलं आहे. आशिषनं दाखवलेल्या या मोठेपणाचं सर्वत्रचं कौतुक होतं आहे. आणि यावरूनचं त्यांच्यात किती घट्ट मैत्री आहे हे सुद्धा दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर आशिष आणि दानिशच्या या मैत्रीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. (हे वाचा: ‘नाईलाजानं करावा लागतो मेकअप’; सई ताम्हणकरनं व्यक्त केली खंत ) नुकताच इंडियन आयडॉलवर एक ‘ईद स्पेशल’ एपिसोड घेण्यात आला होता. यामध्ये आशिषने आपण रोजा धरल्याचं सांगितलं होतं. हे समजताच परीक्षकांसोबतचं सर्व चाहतेसुद्धा या दोघांच्या मैत्रीच्या प्रेमात पडले आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. (हे वाचा: मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावतच्या ‘या’ हॉट फोटोंची आजही होतेय चर्चा, पाहा PHOTO ) इंडियन आयडॉल 12 सध्या चांगलीच टीआरपी मिळवत आहे. यामध्ये नेहा कक्कर विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. तर पवनदीप, अंजली गायकवाड, शण्मुखप्रिया, सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, सवाई भट्ट, मोहम्मद दानिश आणि अरुनिता कांजीलाल असे स्पर्धक आहेत. तर आदित्य नारायण या शोचा होस्ट आहे.